
शैलेश मोटघरे
गोंडऊमरी/रेल्वे :
साकोली तालुक्यात असलेल्या आलेबेदर येथील त्रीरत्न बौद्धविहार येथे फाल्गुन पौर्णिमेनिमित्त दि. 13 व 14 मार्च 2025 ला दोन दिवसीय बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे.याप्रसंगी भिक्खु महापंथ महास्तविर नागपूर, पूज्य भिक्खु सुगत महस्ताविर, धम्म सेवक नागपूर, पूज्य भिक्खू डॉ. शीलवंत महात्सविर, पूज्य भिक्खु नागदीपंकर, पूज्य भिक्खू ज्ञानज्योती महस्तविर, पूज्य भिक्खू नंद, भिक्खू सुजात तिस्स, पुज्य भिक्खु सूर्यज्योती, भिक्खू विपश्शी, भंते चेती संगा रामगिरी, पूज्य भिक्खू सुजाता, भिक्खू महेंद्र ज्योती व इतर
भिक्खु या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी दि. 13 व 14 मार्च 2025 थम्म ध्वजारोह पूज्य भिक्खू ज्ञानज्योती महास्तविर यांच्या हस्ते होणार आहे.उपासकांना शील देणे, उपासक उपासिकांना भोजनदान, भिक्खू संघाची धम्मदेशना, भिक्खू संघाचे स्वागत व रात्री 10 वाजता परित्राण पाठ आहे. तर दि. 14 मार्च ला पहाटे बुद्ध वंदना, मंगल मैत्री समता सैनिक दलाचे पथ संचालन उपासक प्रा. शंकर बागडे, भिक्खू संघाची धम्मदेशना भिकू संघाद्वारे सायं. 7 वाजता भिक्खू संघाद्वारे बुद्ध वंदना रात्री 8 वाजता प्रबोधनात्मक बुद्ध भीम गीतांचा संगीतमय कार्यक्रम याप्रसंगी उद्घाटक जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते भंडारा, अध्यक्षस्थानी इंजि. सचिन मेश्राम, प्रमुख अतिथी सिद्धार्थ गायकवाड, माजी सभापती मदन रामटेके, सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम, इंजि. नरेश गणवीर, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. एफ. कोचे, गजेंद्र गजभिये, सामाजिक कार्यकर्ते नरेश राऊत, किशोर उके, प्रा.टि. के. रंगारी, माजी सभापती रेखा वासनिक, डी.जी. रंगारी, प्रज्ञा दिरबुडे, प्रशांत गणवीर, वसंत रामटेके, दीपक मेश्राम इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यानंतर भीम बुद्ध गीतांचा संगीतमय कार्यक्रम मनोज गोसावी, प्रशांत नागरे, सुभाष कोठारे, मनोज कोटांगले, भावेश कोटांगले हे सादर करणार आहेत.तरी या कार्यक्रमाचा लाभजास्तीत जास्त संख्येने बौद्ध उपासकांनी घ्यावा, असे आवाहन कार्यक्रम उत्सव समिती व भिक्खू संघाने केलेला आहे..
Discussion about this post