1 Total Views , 1 views today
नागपूर खंडपिठाचे राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांचे वादग्रस्त वक्तव्य –
नागपूर खंडपिठाचे राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी मंगळवार दिनांक 19/08/2024 च्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या आयोजित ‘माध्यम संवाद ‘या कार्यक्रमात संवाद साधतांना माहिती मागणाऱ्या जनसेवकास जनू धमकीच दिल्यासारखे संवादातून स्पष्ट दिसले.
राज्य माहिती आयुक्त मा. राहुल पांडे यांनी आयोजित माध्यम संवाद या कार्यक्रमात संवाद साधतांना माहिती अधिकार कायद्याचा उपयोग जनहितासाठी व्हावा.अनेक जन वाईट हेतूने व खंडणी उकळण्यासाठी माहिती मागवतात असे वक्तव्य केले.म्हणजे माहिती आयुक्त राहुल पांडे यांच्या मते आर .टी.आय. अंतर्गत माहिती मागण्याची मर्यादा फिक्स करावी असा उल्लेख केला.
माहिती मागवने चा अर्थ पांडे यांच्या मते माहिती घेणे म्हणजे खंडणी वसुल करणे असा होतो की काय? आणि राहुल पांडे शासकीय विभागांना व अधिकारी यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न आहे की काय?असे निदर्शनास येते.
आणि माहिती मागवण्याच्या मर्यादा जर घालण्याचा प्रयत्न जर सरकारने केला तर अधिकारी कायद्यातून सुटतील अधिकाऱ्यांवर वचक राहणार नाही व प्रत्येक विभागीतील शासकीय अधिकारी खुल्लामखुल्ला भ्रष्टाचार करतील व भ्रष्टाचार भष्मासुरासारखा तोंड वर काढेल.
आणि गोरगरीब जनतेस कोणत्याही प्रकारची माहिती कुठल्याच शासकीय विभागाबद्दल मिळणार नाही.
आयुक्त राहुल पांडे यांनी माहिती अधिकार कायद्याबद्दल केलेले वक्तव्य जनतेच्या मते वादग्रस्तच ठरले.
ता. प्रीतिनिधी -देविदास वायाळ
Discussion about this post