जामखेड तालुका प्रतिनिधी –
महाराष्ट्र राज्य डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघटनेची जामखेड कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष राजा माने व राज्य समन्वयक इकबाल शेख सह इतर पदाधिकाऱ्या च्या उपस्थित जाहीर करण्यात आली असून जामखेड तालुका अध्यक्ष पदी नंदुसिंग परदेशी तर उपाध्यक्ष पदी बाळासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली असून उपस्थित मान्यवर पत्रकाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या
महाराष्ट्र राज्य डिजीटल मिडीया संपादक पत्रकार संघ या संघटनेची जामखेड तालुका कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष राजा माने सर राज्य उपाध्यक्ष सतिष सावंत सर पश्चीम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले सर उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष चिंधे सर राज्य समन्वयक इकबाल शेख बार्शी तालुकाध्यक्ष धिरज शेळक सह जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकार बंधु यांच्या उपस्थित शासकीय विश्रामगृह नगर रोड जामखेड येथे करण्यात आली जामखेड डिजीटल मिडीया संघटनेचे तालुका अध्यक्ष म्हणून जेष्ठ पत्रकार तथा एन टी व्ही न्युज मराठी चे जिल्हा प्रतिनिधी नंदु परदेशी यांची उपाध्यक्ष म्हणून बाळासाहेब शिंदे कार्याध्यक्ष दत्तराज पवार सल्लागार श्रीकृष्ण दुशी सचिव पोपट गायकवाड पिंपरखेड सह सचिव धनराज पवार तर खजीनदार म्हणून फारूक शेख यांची निवड करण्यात आली असून
कार्यकारिणी सदस्य म्हणून अशोक वीर सुजित धनवे तुळशीदास गोपाळघरे अजय अवसरे रियाज शेख तर सदस्य म्हणून अमृत कारंडे रोहीत राजगुरु असुतोष गायकवाड धनसिंग साळुंके रुषीकेष कुचेकर सुनील गोलांडे राजु भोगील यांची निवड करण्यात आली असून इतर हि अनेक अनु उपस्थित डिजीटल पत्रकाराची नोंदणी करून सदस्य नोंदणी करण्याचे संघटनेच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान जेष्ठ पत्रकार तथा जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण अशोक निमोणकर सुदाम वराट अविनाश बोधले पप्पु सय्यद किरण रेडे राजु भोगील सह इतर पत्रकारांच्या वतीने करण्यात आला
यावेळी जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना व त्यांचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते कार्य कारणी निवडी नंतर उपस्थितांच्या वतीने नव निर्वाचीत अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकारीणी सदस्य व सदस्याचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या तर आपण सदैव पत्रकारांच्या पाठीशी खंबीर उभे राहुन त्यांना साथ देऊ असे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केले .
Discussion about this post