(घनसावंगी, प्रतिनिधी दि. २०)
आजच्या संगणकीय युगात साक्षरता,निरक्षरता याबद्दलच्या व्याख्या पार बदलून गेलेल्या आहेत. उच्च विद्या विभूषित असलेली व्यक्ती व त्याने अनेक पदव्या संपादन केलेल्या असल्या तरी त्याला माणूसकिचे मानवतावादी जीवन जगता येत नसेल तर त्याचे जीवन व्यर्थ आहे. अशा परिस्थितीत निरक्षर असलेल्या बहिणाबाईंचे तत्त्वज्ञान हे समाजास कायम प्रेरणादायी ठरणारे आहे. असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण व विस्तार विभागाचे संचालक तथा विभाग प्रमुख डॉ. सुधाकर शेंडगे यांनी संत रामदास महाविद्यालय घनसावंगी येथे आजीवन शिक्षण व विस्तार विभाग अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी समुपदेशन व व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. गजानन अवचार हे होते. तर प्रबोधन मंचावर मॉडेल कॉलेजचे उपप्राचार्य कन्नुलाल विटोरे, घनसावंगी तालुक्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुयश तांगडे, हिंदी विभागाचे डॉ. संतोष आडे आणि आज वन शिक्षण विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. विजयानंद जामकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सुधाकर शेंडगे यांनी सावित्रीबाई फुले बहिणाबाई चौधरी यांच्या कार्याचा विशेष उल्लेख आपल्या व्याख्यानामध्ये केला दैववाद अंधश्रद्धा रूढी परंपरा यामध्ये न गुरुफटता शिक्षणाची कास धरून स्वकर्तुत्वावर व आपल्या परिश्रमावर विद्यार्थ्यांनी स्वावलंबी व्हावे व स्वतःचा व समाजाचा विकास घडवावा असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
ऑलम्पिक व प्यारा ओलंपिक स्पर्धेचे उदाहरण विद्यार्थ्यांना देताना त्यांनी स्वतः मधील क्षमता व आत्मविश्वास हा महत्त्वाचा असतो व याद्वारेच आपण यशाचे शिखर गाठू शकतो हा आत्मविश्वासही त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जागृत केला. संत कबीर यांच्या तत्त्वज्ञानाचा उल्लेख करून समाजातून तसेच सभोवतालच्या परिसरामधून ही विद्यार्थी आपली शैक्षणिक प्रगती व जडणघडण पूर्ण करू शकतो व आपल्या स्वतःचा विकास करू शकतो याबरोबरच लेखन वाचन व संभाषण कौशल्य बाबत बोलताना म्हणाले की वरील तिन्ही कौशल्य विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये आवश्यक आहेत पुस्तकातूनच किंवा वर्गातूनच शिक्षण विद्यार्थ्यांना सर्व गुण संपन्न बनवत नाही तर वर्गाच्या बाहेर समाजामध्ये मिळणारे अनौपचारिक शिक्षण ही विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये भर घालत असते विद्यार्थ्यांनी महान लेखक तत्त्ववेत्ते व वैज्ञानिक यांचे चरित्र वाचून स्वतःचे चरित्र घडवावे असा उपदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना याप्रसंगी केला. प्रमुख उपस्थितीमध्ये असलेले घनसावंगी चे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री सुरेश तांगडे यांनी विद्यार्थ्यांना पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये असलेल्या संधी ,स्पर्धा परीक्षा निवड प्रक्रिया ,व उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधी, बाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले भारतासारख्या शेतीप्रधान देशांमध्ये पशुपक्ष्यांना किती महत्त्व आहे त्यांना होणारे आजार व त्यावरील उपचार याप्रसंगी त्यांनी विशारद केले.
आपल्या प्रास्ताविक पर भाषणामध्ये बोलताना प्रा. डॉ. विजयानंद जामकर यांनी आजीवन शिक्षण विस्तार विभागाचे चालत असलेले महाविद्यालयीन कार्य तसेच समाजामध्ये चालत असलेले सामाजिक कार्य याचा लेखाजोखा विद्यार्थ्यांसमोर मांडला.
आपल्या अध्यक्षीय समारोप भाषणामध्ये बोलताना डॉक्टर गजानन अवचार यांनी चार भिंतीमधील औपचारिक शिक्षणासमवेद समाज जीवनातील अनौपचारिक शिक्षण ही काळाची गरज आहे याद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष आडे यांनी केले, याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.
Discussion about this post