प्रतिनिधी.. मुरली राठोड मो.. 9307493402
आर्णी (ता.प्र.) जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिजधाम शाखा आर्णी येथील श्री स्वरूप संप्रदाय तालुका सेवा समितीच्या वतीने आज ग्रामीण रुग्णालयात रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यात ६५ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यात मोलाचा वाटा उचलला व दुसर्यांना जिवनदन देण्याचे कार्य केले आज सकाळी ग्रामिण रुग्णालय येथे जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करून रक्तदान शिबिराला सुरवात झाली. यवतमाळ येथील स्व वसंतराव नाईक जिल्हा रुग्णालय ची रक्तपेढी च्या पथकाने आर्णी त ग्रामिण रुग्णालय येथे रक्तदात्यांनी उचित मार्गदर्शन करून रक्तदान साठी प्रोत्साहन दिले. यात जिल्हा रुग्णालय रक्त पतपेढीचे डॉ ऋषिकेश जिरापुरे रक्त संक्रमण अधिकारी कबिर दरणे समाजसेवा अधिक्षक, मोहन तळवेकर ब्रदर, दर्शन बेलोकर तंत्रज्ञ, अभय मुरकुरे ईत्दिनी केले. रक्तदान शिबिरात जिल्हा व नांदेड जिल्हातिल भक्तगणांनी शिबिराला भेट दिली
तालुक्यातील रक्तदात्यांनी या रक्तदान महायज्ञ शिबिरात रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले होते. शिबिराच्यर्णी सफलतार्थ सेवा समितीचे निलेश चालीकवार, प्रमोद खोपे, प्रफुल खोपे, ओम ढेंगे, आकाश शिंदे, विनायक जाधव, नितीन कुमरे, अरविंद धुर्वे, प्रदिप किनकर, सुरज रणदये, लखन मडावी राजेश माहेश्वरी आदी यांनी प्रयत्न केले….
Discussion about this post