धर्माबाद:१८ जानेवारी रोजी संध्याकाळी ७ च्या सुमारास येताळा ते करखेली रस्त्यावर येताळा गावानजीक ही घटना घडली असून अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पायी चालणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मयताचे गणपत सोनबा मरोळे रा बोळसा बू ता उमरी असे आहे. रात्री घटना घडताच धर्माबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रेताच्या उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथे आणण्यात आले होते. आज उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला आहे
Discussion about this post