प्रतिनिधी:- पांडुरंग गाडे
खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक तथा श्रीक्षेत्र येलवाडी ग्रामपंचायतचे विद्यमान लोकनियुक्त सरपंच श्री रणजीत शेठ गाडे, उपसरपंच सौ बेबीताई पाटोळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्यातून व सरपंच श्री रणजीत गाडे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून येलवाडी शाळेच्या प्रांगणात चार हायमॅक लाईट बसवण्यात आले .
संपूर्ण प्रांगण प्रकाशमय झाले असून विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे विद्यार्थी हा अंधकाराकडून प्रकाशाकडे जात असताना त्याच्या शैक्षणिक प्रगतीत जसा उत्साह प्रकाश निर्माण होतो हाच अंधार दूर करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतच्या मार्फत झाला असून त्यामुळे सर्व शिक्षक विद्यार्थी पालक व गावकऱ्यांमध्ये शाळेविषयी ओढ निर्माण झाली असून ग्रामपंचायतच्या या सहकार्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद यांच्या वतीने मनःपूर्वक धन्यवाद
Discussion about this post