पाथरी(प्रतिनिधी) अहमद अन्सारी पाथरी परभणी 431506.
तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे शासनाच्या केंद्रस्तरीय समितीकडून थर्ड पार्टी ऑडिट करण्यात यावी अशी मागणी पाथरी येथील संपादक/पत्रकार लक्ष्मण उजगरे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी परभणी व मुख्याधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्याकडे केली आहे.
सविस्तर बातमी अशी की देण्यात आलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाथरी तालुक्यातील एकूण 44 योजना मंजूर करण्यात आल्या आहेत.परंतु 44 योजना पैकी एका माहिती अधिकारात मागवलेल्या माहितीनुसार केवळ नऊ ते दहाच योजना पूर्ण झालेले असून त्यातही सदर योजनांची वीज जोडणी अध्यापय बाकी आहे.या कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे सिमेंट,स्टील,पाईप वापरले असून त्याचबरोबर गावातील अंतर्गत पाईपलाईन या केवळ एक ते दीड फुटावर करण्यात आलेले आहे.
तर काही ठिकाणी पाण्याची तीव्रता वाढवण्यासाठी लावण्यात येणारे फिरून वालच बसवले नाहीत या सर्व प्रकारातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे अशा तक्रारी वारंवार ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद परभणी यांच्याकडे वारंवार करण्यात आले आहेत त्यामुळे पाथरी तालुक्यातील जलजीवर मिशन योजनेच्या कामाचे केंद्रीय स्तरीय समितीकडून थर्ड पार्टी ऑडिट करण्यात यावे जेणेकरून या कामामधील भ्रष्टाचार उघड होणार आहे.
चौकट
वेळ पूर्ण होऊन देखील अद्यापही योजना अपूर्णच
पाथरी तालुक्यामध्ये जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 44 ठिकाणी या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून सदरील योजनेचा 44 पैकी केवळ एक ते दोन गावची योजना वगळता सर्व जलजीवन मिशन योजनेच्या काम पूर्ण करण्याची तारीख ही 2024 मधील एप्रिल मार्च या महिन्यामध्ये पूर्ण झालेले असून अद्यापही पाथरी तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेची कामे पूर्ण झालेली नसून या कामांचे भट्ट्याबोळ करण्याचे काम या अधिकारी व कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे होताना दिसून येत आहे
प्रतिनिधी अहमद अन्सारी पाथरी परभणी 7218275486.
Discussion about this post