विवाह जुळविण्यात ‘सिबिल’चा नवा स्पीड ब्रेकर !
विवाह जुळवणीच्या मार्गात ‘सिबिल’चा (क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड) या पतमानांकनाचा नवा अडथळा तयार होताना दिसत आहे. वधू पक्षाकडून अन्य बाबींबरोबरच ‘सिबिल’चीही पडताळणी केली जात असल्याने लग्नाळूच्या अडचणीत वाढ झाली आहे.
गेल्या दशक-दीड दशकांत मुलींच्या उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. साहजिकच मुलींच्या अपेक्षाही वाढल्याआहेत. या पात्रता निकषांचे अडथळे पार करताना वर पक्षाला नाकीनऊ येत असल्याचे चित्र आहे. आता यात नव्या एका ‘स्पीड ब्रेकर’ची भर पडली आहे. वधू पक्षाकडून वराचा किंवा त्याच्या कुटुंबातील प्रमुखाचा ‘सिबिल’ मानांकन तपासले जात असल्याचे समोर येत आहे. वधू पक्षाकडून ‘सिबिल” अहवाल काढला जात आहे.
त्यामुळे कोणत्या बँकेत किती कर्ज आहे, त्याचे हप्ते कसे भरले आहेत की कर्ज थकीत आहे, अन्य कोणाच्या कर्जाला जामीन आहे काय अशी माहिती तपासून पाहिल जात आहे.
सिबील खराब होऊ देऊ नका अन्यथा लग्न होणार नाही .
Discussion about this post