उदगीर/प्रतिनिधी :उदगीर येथून जवळच असलेल्या जि. प.प्रा.शा. कल्लूर येथे शाळेचे जेष्ठ शिक्षक श्रीमान गादगे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य विठ्ठलराव धमने ,राजकुमार कुंडगीर यांनी शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान केला व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी गादगे सरांना त्यांचे भावी जीवन व आरोग्य सुखसमृद्धीचे जावो अशा दिलखुस व्यक्तीमत्व सरांना अनंत शुभेच्छा दिल्या.तसेच या आदर्श व्यक्तिमत्त्व असलेल्या शिक्षकांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शाळेतील सर्व 1ली-7वी च्या विद्यार्थांना प्रत्येकी एक वही व एक पेन दिले.सराचा 58 वा वाढदिवस शाळेत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.शेवटी गादगे सरांनी सर्वांना चाकलेट वाटप करण्यात आले.तरी या वाढदिवसाने चिमुकल्या मुलांचे शिक्षकाविषयीचे प्रेम दिसून आले.तरी सर्वांनी या गादगे सरांसारखे वाढदिवसानिमित्त विद्यार्थांना प्रोत्साहन पर शैक्षणिक साहित्य देऊन विद्यार्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होईल असे जनतेतून बोलले जात आहे.
Discussion about this post