उदगीर/प्रतिनिधी: संत साहित्याचे अभ्यासक आणि वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. सद्गुरू डॉ. किसन महाराज साखरे यांच्या निधनानं समाजाला योग्य दिशा दाखवणारा थोर विचारवंत काळाच्या पडद्याआड गेला आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रात साखरे महाराजांनी केलेलं प्रबोधन मोलाचं आहे. आपल्या कीर्तन व प्रवचनातून त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. संगणक क्षेत्रात सुद्धा त्यांनी कित्येक विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास हातभार लावला. सामाजिक जडणघडणीतील त्यांचं योगदान हे कायम स्मरणात राहील. त्यांचं निधन ही वारकरी संप्रदायासह महाराष्ट्राची मोठी हानी आहे. डॉ. किसन महाराज साखरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली
Discussion about this post