प्रतिनिधी:- अनीस शेख
नांदेड| मिसिंग मधील इसमाचा खून करणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन नांदेड ग्रामीण पोलिसांनी दोघांना गजाआड केले आहे याबाबत सविस्तर असे की, अबिनाश कुमार पोलीस अधिक्षक नांदेड. यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत गुन्हे निर्गतीचे आदेश सर्व पो. स्टे. प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने. पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स्टे.नांदेड ग्रामीण मिसीग क्र.१७/२०२५ मध्ये तपासाचे चक्र फिरवून हरवलेला इसम दत्ता हनुमंत कोल्हे वय २८ वर्ष रां. भायेगाव ता. जि. नांदेड याचा शोध घेत असताना चार इसमांना सशयावरून ताब्यात घेतले होते त्यापैकी १) विश्वनाथ गोपीनाथ कोल्हे २) गणेश संजय कोल्हे रा. भायेगाव ता. जि. नांदेड यांना ताब्यात घेऊन सशयीत इसमांना विश्वासात घेऊन कौशल्यपूर्ण तपास केला असता मयत दत्ता हनमंत कोल्हे याचा धारदार शास्त्राने खून करून, त्याचे प्रेत तुप्पा शिवारातील लोहेकर खरवडकर यांचे शेतातील खदानित नायलॉनच्या पोत्यात टाकून सिमेन्ट पोलला ताराने बांधून त्याचे मोटरसायकल सह खदानी च्या पाण्यात टाकले. आरोपीताने गुन्हा केल्याचे कबूल केले वं खदानीचे पाण्यात टाकलेले दत्ता हनमंत कोल्हे याचे प्रेत दाखविले. त्यावरून पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे. गु. र.नं.१३९/२०२५ कलम १०३(१),२३८,३(५) भारतीय न्याय संहिता-२०२३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदरची कामगीरी करणाऱ्या पथकांचे वरिष्ठांनी कौतुक केले आहे. नमूद गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक, सुरेश मान्टे हे करीत आहेत ही कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक साहेब,नांदेड,खंडेराव धरणे अपर पोलीस अधिक्षक, भोकर, सुरज गुरव,अपर पोलीस अधीक्षक,नांदेड, सुशील कुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग, इतवारा, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक पो.स्टे.नांदेड ग्रामीण, सुरेश मान्टे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो.स्टे.नांदेड ग्रामीण, बाबुराव चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक,पो.स्ट. नांदेड ग्रामीण, ज्ञानेश्वर मटवाड, पोलीस उपनिरीक्षक, पो.स्टे. नांदेड ग्रामीण पोलीस अंमलदार:-पोहेंकॉ. व्यवहारे, पोहेंकॉ. गटलेवार,पोहेंकॉ.मोरे,पोना. डफडे,पोकॉ /३८९ पवार, पो कॉ. कल्याणकर,पोकॉ. जमीर यांनी केली आहे…
Discussion about this post