प्रतिनिधी:- ज्ञानेश्वर सावळे
आज मुक्ताईनगर,पुर्णाड फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग 753 L बाधित शेतकरी संघर्ष समिती,मुक्ताईनगर तालुक्यातर्फे पूर्णा नदी पुलाच्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी काम बंद आंदोलन केले असता सदरील आंदोलनात पाठिंबा देऊन,सहभागी होऊन शेतकरी बांधवांच्या अडचणी जाणून घेऊन भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना मिळत असलेला मोबदला अल्प प्रमाणात असल्याने समृद्धी महामार्ग प्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला मिळावा तसेच पूर्णाड_फाटा येथील उड्डाणपूल रद्द होऊन त्या ठिकाणी सर्कल व्हावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.
याप्रसंगी संबंधित शेतकरी बांधव,महायुती पदाधिकारी,शिवसैनिक उपस्थित होते.
Discussion about this post