श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी:- राहुल कोठारे.
आज दिनांक – ७फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी पारगाव सुद्रीक याठिकाणी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, तसेच त्यागमूर्ती माता रमाई यांची संयुक्त जयंती पंचशिल तरुण मंडळाच्या वतीने साजरी करण्यात येत आहे. यावेळी महिलांनी प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन केले यामध्ये आद.मंदाताई जावळे, आयु.नी.कल्पणा पंडित, आय.नी.मालन ताई घोडके, तसेच महाराष्ट्र समाजभूषण पुरस्कार प्राप्त आद. हिराताई गोरखे, तसेच डॉ राजेंद्र प्रसाद विद्यालय पारगाव सुद्रीक येथील शिक्षिका वृंद तसेच जि. प. प्राथ. शाळेतील शिक्षिका उपस्थित होत्या. त्यानंतर दीप व धूप प्रज्वलित करण्यात आले. तसेच यानंतर आद.राहुल आल्हाट विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर आयु.भारत आल्हाट बौद्धाचार्य यांनी सर्वांकडून सामूहिक बुद्ध वंदना ग्रहण करून अभिवादन केले. यावेळी महिला भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये आद.राहुल कोठारे पत्रकार उपस्थित होते. आज ७ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजता भव्यदिव्य अशा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.माता रमाई जयंती उत्सव कमीटीचे सदस्य आयु. साहिल आल्हाट, आयु.विशाल घोडके, आयु. अभिजित आल्हाट आयु. स्वप्नील घोडके, आयु.अक्षय आल्हाट, आयु.आशिष आल्हाट, आयु. जौजाळ तुषार,यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खुप परिश्रम घेतले. तसेच पंचशील तरुण मंडळाच्या वतीने सर्वांना सायंकाळी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Discussion about this post