प्रतिनिधी:- योगेश कोरगावकर
“रत्नागिरीचा राजा” सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडळाच्या वतिने माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने दि. ०९/०२/२०२४ रोजी सावरकर नाट्यगृह, मारुती मंदिर येथे शालेय विद्यार्थ्यांचा लहान आणि मोठा गटाची “चित्रकला स्पर्धा २०२५” उत्साहामध्ये संपन्न झाली असल्याचे अध्यक्ष श्री. राजन सुर्वे यांनी सांगितले. चित्रकला स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद लाभला ४०० विध्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला तसेच मुलांच्या पालकांनी स्पर्धेला चांगले सहकार्य केले तसेच स्पर्धेचे परिक्षक श्री. कांबळे सर आणि श्री. अमोल शिवलकर सर यांनी स्पर्धेचे विजेत्यांची निवड योग्य पद्धतीने केली असल्याचे मंडळाचे उत्सव कमीटी सल्लागार श्री. सुकेश शिवलकर यांनी सांगितले.
चित्रकला स्पर्धेला १ ली ते २ री चित्रामध्ये रंग भरणेसाठी लहान मुलांची संख्या मोठ्याप्रमाणात होती त्यासाठी पालक स्वत: जातीनिशी उपस्थीत राहुन मुलांना प्रोत्साहन देत होते त्यामुळे स्पर्धेला चांगला उत्साह दिसुन आला असल्याचे महीला कमीटीच्या अध्यक्षा सौ. पुजाताई जाधव यांनी सांगितले. चित्रकला स्पर्धेला इयत्ता ३ री ते ४ थी साठी १) माझी सहल २) माझी शाळा ३) माझा परिसर, इयत्ता ५ वी ते ७ वी साठी १) फ्लॉअर पॉट २) चौपाटीवर पतंग उडविणारी मुल ३) मला पडलेले स्वप्न, इयत्ता ८ वी ते १० वी साठी १) आवडता खेळ २) आवडता सण ३) ग्राम स्वच्छता करणारे विद्यार्थी असे विषय मंडळाकडून देण्यात आले होते. सर्व स्पर्धकांनी वेगवेगळे विषय घेऊन चांगली चित्रे रेखाटली असल्याचे उत्सव कमीटीचे उपाध्यक्ष श्री. योगेश कोरगावकर आणि उत्सव कमीटीचे सचिव श्री. रविंद्र खेडेकर यांनी सांगितले.
“चित्रकला स्पर्धा २०२५” गट १ ली ते २ री रंग भरणे स्पर्धेमध्ये प्रथम क्रमाक कु. रिध्दी सुखेद पवार, द्वितीय क्रमांक कु. अन्वी योगेश मयेकर, तृतिय क्रमांक कु. तिर्था नागवेकर इयत्ता ३ री ते ४ थी गटामध्ये प्रथम क्रमाक कु. श्लोक बाजीराव गावडे, द्वितीय क्रमांक कु. अमित शैलेश कुंभवडेकर, तृतिय क्रमांक कु. नंदन गणेश पवार ५ वी ते ७ वी गटामध्ये प्रथम क्रमांक कु. श्रेयश सचिन बापट, द्वितिय क्रमांक कु. श्लोक समिर पडवेकर, तृतिय क्रमांक कु. आर्या रुपेश शिंदे ८ वी ते १० वी गटामध्ये प्रथम क्रमांक कु. ओम हर्ष कोतवडेकर, द्वितीय क्रमांक कु. माही स्वप्नील सावंत, तृतिय क्रमांक कु. सोनाली शितल साळवी हे विद्यार्थी विजेते ठरले असल्याचे उत्सव कमिटीचे सहखजिनदार श्री. ओंकार कारेकर आणि सदस्य श्री. आशिष चव्हाण यांनी सांगितले.
चित्रकला स्पर्धेमध्ये सर्व स्पर्धकांनी चांगली चित्रे रेखाटली होती त्यामुळे विजेते निवड करताना आम्हाला विशिष्ठ पद्धतीने परिक्षण करुन निकाल देण्यात आले त्यामूळे जे विद्यार्थी विजेते झाले नसले तरी त्यांनी काढलेली चित्रेसुद्धा चांगली होती त्यांची मेहनत वाखणण्यासारखी होती असे परिक्षक श्री. कांबळे सर आणि श्री. अमोल शिवलकर सर यांनी सांगितले.
चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे पदाधिकारी श्रीमती पुजाताई जाधव, सौ. राजश्री लोटणकर, सौ. रेश्मा कोळंबेकर, सॊ. श्वेता कोरगावकर, श्री. योगेश कोरगावकर, श्री. सुकेश शिवलकर, श्री. आशिष चव्हाण, श्री. ओंकार कारेकर, श्री. रविंद्र खेडेकर, श्री. नंदकुमार मोरे, श्री. सिध्दराज रेडीज, श्री. अथर्व पांगम, श्री. अथर्व पाथरे आदी पदाधीकारी यांनी मेहनत घेतली
Discussion about this post