कृष्णावेणी उत्सवाची सांगता
भक्तिमय वातावरणात उत्साहात कृष्णामाईची महाआरती काल संध्याकाळी कृष्णा घाट मिरज येथे संपन्न झाली.महाआरतीने तसेच पुरोहितांच्या मंत्रपुष्प आणि आशीर्वाचनाने उत्सवाची सांगता झाली. भजन कीर्तन गाण्याचे कार्यक्रम कथक नृत्य पंचोपचार पूजा श्री सूक्त हवन असे सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याचबरोबर घाट परिसराची आणि नदी काठी स्वच्छता कृष्णावणी समितीच्या भक्तमंडळी कडून करण्यात आली.
कथ्थक नृत्य केंद्राने सादर केलेल्या कथ्थक नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.दिनांक 8 फेब्रुवारी रोजी मिरज शहरातून पालखीचे आयोजन करण्यात आले होते मंगळवार पेठ ब्राह्मणपुरी लक्ष्मी मार्केट आणि किल्ला भाग या मार्गावर पालखीचे भक्तांकडून जोरदार स्वागत करण्यात आले होते. रांगोळी औक्षण सरबत वाटप इत्यादी प्रकारे भक्त मंडळींनी पालखी सोहळ्यात सहभाग घेतला.
सकाळी श्रीसूक्त चे हवन श्री बर्वे गुरुजी मुंबई आणि अनिकेत अर्जुनवाडकर गुरुजी यांच्या द्वारे करण्यात आले.कृष्णा घाट मिरज येथे महाआरती मंत्र पुष्प श्री पुंडलिक आठवले श्री ज्येष्ठराज गोळे, तोरो गुरुजी, भालचंद्र शुक्ल आणि अरविंद रुपलग या पुरोहितांद्वारे करण्यात आले.
कार्यक्रमास श्री दीपक बाबा शिंदे निरंजन आवटी सौ जयश्रीताई कुरणे श्री मोहन वानखंडे सर डॉक्टर संजय पाटील डॉक्टर रोहिणी पाटील हेमंत भुरके विवेक शेटे सौ अनिता वणखंदे श्री अशोक खडीलकर नितेश ओझा, राजेंद्र बेडेकर प्रसाद शनबाग उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन निमंत्रक ओमकार शुक्ल यांनी केले, सूत्रसंचालन निलेश साठे यांनी केले अनघा कुलकर्णी यांनी आभार मानले.उत्सव यशस्वी करण्यास श्रीपाद भट शर्वरी कुलकर्णी शंतनु कुलकर्णी सौ अमिषा करंबेळकर संतोष कुलकर्णी, दिगंबर कुलकर्णी, गोविंद मेंढेगिरी मनोज यादव नम्रता साठे श्रीकांत देशपांडे,वर्षा वांडरे सारिका राहुटे,गायत्री सातपुते, सीमा मगदूम,डॉ चैत्राली शुक्ल,महेश पोंक्षे, चैतन्य तांबोळकर, आकाश सोनीकर अक्षय सोनीकर यांनी प्रयत्न केले.
देश देवधर्म साधुसंतांच्या जयघोशात कार्यक्रमाची सांगता झाली.
Discussion about this post