
हातकणंगले ता . १३ आळते (ता. हातकणंगले) गावाला हादरवून टाकणाऱ्या एका धक्कादायक घटनेत, एका ५ वर्षाच्या मुलीवर मंगळवारी (ता. ११) दुपारी दिडच्या सुमारास अश्लील कृत्य करण्यात आल्याचे वृत्त आहे ज्यामुळे स्थानिक लोकांना धक्काच बसला आहे. सुरुवातीच्या अहवालांनुसार, संशयित गुन्हेगार हा पीडितेच्या नातेवाईक असून प्रविण रामचंद्र जाधव (वय वर्ष ३३ रा. चापोडी महोडे, राशिवडे ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) असे आरोपीचे नांव आहे . संशियत आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत हातकणंगले पोलीस ठाण्यात सुरू होते.
डीवायएसपी रोहिणी सोळंके यांनी हातकणंगले पोलीस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती घेऊन तपास जलद गतीने करण्याचे आदेश दिले. पुढील तपास पीएसआय शैलजा पाटील करीत आहेत. याबाबत पोलिसातून मिळाली माहिती अशी की, नराधम संशयित आरोपी प्रविण जाधव हा विवाहित असून त्याला नऊ वर्षाचा मुलगा आहे. त्याची पत्नी माहेरी म्हाळुंगे गावी राहत असून संशयित आरोपी हातकणंगले येथील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो.
मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता तो आळते येथील नातेवाईकांच्या घरी आला. त्यानंतर नातेवाईकांनी त्याला जेवायला घातले. जेवून झाल्यानंतर तो झोपायला दुसऱ्या खोलीत गेला. दुपारी दीड सुमारास पाच वर्षाच्या बालिकेला बोलावून घेतले व छेडछाड करीत अशोभनीय कृत्य करून अंगावर घेण्याचा प्रयत्न केला.यावेळी बालिकेच्या आईने चालू असलेला प्रकार बघितला व तात्काळ आपल्या सासऱ्यांना सांगितला. सासऱ्यांनी त्याला घरातून बाहेर हाकलत शेजाऱ्यांना बोलावून घेतले व सदरचा सर्व घडला प्रकार सांगितला. त्यानंतर शेजारील लोकांनी संशयित आरोपी जाधव याला ताब्यात घेऊन जाब विचारला व त्याला हातकणंगले पोलिसांच्या ताब्यात दिले. रात्री उशिरापर्यंत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
जाधवकडून गुन्ह्याची पुनरावृती- नराधम संशयित आरोपी प्रविण जाधव हा पंधरा दिवसांपूर्वी नातेवाईकांच्या घरी आला होता. त्यावेळी सुद्धा जेवण झाल्यानंतर त्याने दुसऱ्या बालिकेसोबत असा अशोभनीय प्रकार केला होता. मात्र संशयित आरोपी जाधव हा नातेवाईक असून प्रकरण वाढू नये व नात्यांमध्ये दुरावा येऊ नये. या कारणास्तव नातेवाईकांनी त्याला ताकीद देऊन सोडून दिले होते. पण नराधमाने पुन्हा तोच प्रकार त्यांच्या घरात केला.
Discussion about this post