
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री श्री रामनाथ ठाकूरजी यांची आज भेट घेऊन नांदेड जिल्ह्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासंबंधी सखोल चर्चा केली. तसेच,शेतकरी,व्यापारी आणि संबंधित घटकांकडून प्राप्त झालेल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.
महत्त्वाच्या मागण्या:
*देगलूर कृषी उत्पन्न बाजार समिती (जिल्हा नांदेड) साठी नवीन कार्यालय इमारत, शेतकरी निवास आणि कृषी मालाच्या सार्वजनिक लिलावासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणे.*
नवीन कार्यालय इमारतीचे बांधकाम.
शेतकऱ्यांसाठी निवास सुविधा.
कृषी मालाच्या सार्वजनिक लिलावासाठी दोन मोठे शेड हॉल उभारणे.
या प्रकल्पासाठी एकूण 12 कोटी रुपये अनुदान मंजूर करण्याची मागणी.
*फायदे:*
शेतकऱ्यांना आधुनिक आणि सुसज्ज सेवा उपलब्ध होतील.
पारदर्शक आणि सोयीस्कर लिलाव पद्धतीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी अधिक चांगली किंमत मिळेल.
कृषी व्यापाराच्या विस्तारास चालना मिळेल.
अपेक्षित परिणाम:
प्रशासनाच्या कार्यक्षमतेत सुधारणा होईल.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची योग्य सुविधा निर्माण होईल.
आधुनिक आणि सुटसुटीत प्रशासनिक परिसरामुळे स्थानिक विकासाला गती मिळेल.
वरील सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा,याकरिता विनंती करण्यात आली.
राज्यसभा खासदार डॉ.अजितजी गोपछडे
Discussion about this post