अन्यायकारक तहसील विभाजना विरोधात जनआंदोलनासोबतच न्यायालयात जाण्याचा निर्णय…
प्रस्तावित आश्वी बुद्रुक येथील अप्पर तहसील कार्यालय निर्मितीच्या विरोधात ग्रामपंचायत यांनी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव केल्यानंतरही प्रस्तावात कोणत्याही सुधारणा झालेल्या नाही. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रानुसार पूर्वीचाच प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला आहे, त्यामुळे या अन्यायकारक तालुका विभाजनाच्या विरोधात जन आंदोलन उभे करण्यासोबतच न्यायालयाचा दरवाजा ठोठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकनेते #बाळासाहेब_थोरात यांच्या नेतृत्वात आज प्रभावित गावातील नागरिकांची बैठक पार पडली त्यात हा निर्णय करण्यात आला.
Discussion about this post