19 Total Views , 1 views today
पलूस-कडेगाव तालुक्यातील युवकांचे आशास्थान
शरद आत्मनिर्भर अभियानाचा हजारो नागरिकाना लाभ…..पलूस आणि कडेगाव तालुक्यातील म्हणजेच क्रांती साखर कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व गावांमधील शेतकरी कष्टकरी कुटुंबातील लहानमोठ्या सर्व लाकांसाठी आणि खासकरुन महिलांसाठी सर्व क्षेत्रांत सेवाभावी वृत्तीने काम करणेची आणि या भागांतील सर्व महिलाना स्वाभिमानाने जगणेसाठी आणि त्यांचा सर्वागिण विकास करणेचे ध्येय्य नजरेसमोर ठेवत क्रांती उद्याग आणि शिक्षण समुहाचे प्रमुख आमदार अरुण लाड आणि क्रांती साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन शरद लाड यांच्या प्रेरणेने शरद फाउंडेशन ट ही संस्था स्थापन करणेत आली आहे. या फौंडेशनच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासुन शरद आत्मनिर्भर अभियान राबवले जात आहे. या अंतर्गत समाजातील गरजू लोकांसाठी विविध उपक्रम राबवले जातात, ज्यामध्ये गरजू लोकांना वैद्यकीय सुविधा, शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यापासून त्यांच्या कुटुंबाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आर्थिक हातभाराची मदतही पोहचवली गेली आहे.संस्थेच्या उपक्रमांबाबत बोलताना अध्यक्षा धन म्हणाल्या, अभियानामार्फत पलूस व कडेगाव तालुक् महिन्याला रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. शरद आत्मनिर्भर समाजातील कोणत्याही व्यक्तीस रक्ताअभावी जीव गमवाला लागू नये म्हणून प्रत्येक गरजूस मोफत रक्तपुरवठा केला जातो. कधीहा, कितीही, कुठेही, कोणालाही या उक्तीप्रमाणे रक्तदानाचे कणे चालू आहे, शिवाय नेत्र तपासणी शिबिर, बांधकाम काणा, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, सर्व प्रकारचे दाखले मेळावा, आरोग्य तपासणी शिबिर, ज्येष्ठ नागरिक योजना, बाल संगोपन योजना, मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, महिला सक्षमीकरण, हृदय रोग तपासणी शिबिर, थाईरॉईड व सी.बी.सी., रक्त तपासणी गांधी श्रावण बाळ, अपंग पेन्शन अपंग प्रमाणपत्र, लेक लाडकी प्रधानमंत्री मातृ योजना, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, सर्व प्रकारचे दाखले मेळावा. शिबिर, संजय योजना, योजना,याबरोबरच दारिद्य रेषेखालील गरजू लोकांना शासकीय योजनांचा लाभमिळवून देण्याबरोबरच असंख्य वेगवेगळे उपक्रम संस्थेमार्फत राबवले जातात. त्याचबरोबर बाधकाम कामगार कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व मोफत नोंदणी कार्यक्रम राबविण्यासाठी शरद आत्मनिर्भर विशेष प्रयत्नशील आहे. विद्यार्थी शिष्यवृत्ती, बांधकाम साहित्य, संसार संच, विमा संरक्षण, प्रसुती लाभ, लग्नासाठी अर्थसहाय्य अशा २००० पेक्षा जास्त लाभार्थीना लाभ देणेत आज अखेर संस्था यशस्वी झाली आहे. शासकीय बाल संगोपन योजनांचा लाभ गरजू बालकांना मिळवून देण्याबरोबरच किचकट नियम-अटींच्या अभावी काही बालकांना शासकीय लाभ मिळत नाही. अशा बालकांना संगोपनासाठी दत्तक घेणे हा मुख्य उद्देश ठेऊन शरद आत्मनिर्भर काम करीत आहे. या योजनेअंतर्गत अनाथ, निराधार, बेघर, शारिरीक व्यंग किंवा इतर आपत्ती असलेल्या बालकांच्या संगोपनासाठी दरमहा ११००/- रुपये अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.आजअखेर१२६
बालकांना नियमितपणे याचा लाभ मिळत आहे. शासनाच्या राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शरद आत्मनिर्भर तत्पर आहे. आर्थिक मागास असलेल्या घरातील कर्ता पुरुष किंवा स्त्रीच्या निधनानंतर त्यांच्यावरती ओढवलेल्या संकटातून त्यांना तात्काळ बाहेर काढण्यासाठी व एक आधार म्हणून एकरकमी २० हजार रुपये त्या कुटुंबाला अनुदान दिले जाते. योजनेचा लाभमिळवून देण्यात संस्था यशस्वी झाली आहे. दारिद्रय रेषेखालील कुटुंबांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी विशेष मोहिम शरद आत्मनिर्भरमार्फत राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याबरोबर कुटुंबांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित
करणं, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना या योजनेची अंमलबजावणी सातत्याने मोठ्या प्रमाणात राबविण्यात येते. पलूस व कडेगाव तालुक्यातील अनेक निराधारांना या योजनेचा लाभमिळवून देण्यात शरद आत्मनिर्भर यशस्वी झाले आहेत आणि लाभार्थी शोध कार्य चालू आहे. मोफत आरोग्य तपासणी शिबिरांच्या आयोजनाबरोबर रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शरद आत्मनिर्भर विशेष प्रयत्नशील आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष मदत, मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबवून
आज अखेर ८७१ हून अधिक नागरिकांची शस्त्रक्रिया मोफत करणेत आल्या असून ९००० हून अधिक रुग्णांनी यामध्ये तपासणी करून घेतलेली आहे. हृदयरोग तपासणी शिबीर आयोजित करून आज अखेर ९०० हुन अधिक रुग्णांची तपासणी करणेत आली आहे. त्याचप्रमाणे चालरोग शिबीर आयोजित करून आजअखेर ८०० हुन अधिक लहान मुलाच्या तपासणी करून त्यांचेवर मोफत उपचार करणेत आले सध्या महिलांमध्ये थाईरॉईड आजाराचे प्रमाण वाढले असून आजअखेर ३०० हून अधिक महिलांची थाईरॉईड व सी.बी. सी. रक्त तपासणी मोफत करणेत आली आहे. रेशन काई सबंधीत त्रुटी दूर करण्यासाठी शरद आत्मनिर्भर नियमित कार्यरत असते, रेशन कार्डमध्ये नाव वाढवणे, कमी करणे, नवीन रेशनकार्ड देणे उ. कामे शरद आत्मनिर्भर मार्फत मोफत केली जात आहेत. समाजातील काणाही व्यक्तिने कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी शरद फौंडेशनच्या स्वयंसेवकाशी संपर्क साधावा असे आवाहनही धनश्रीताई लाड यानी केले आहे.
Discussion about this post