सध्या राज्य शासनाने १०० दिवसांचा रोड मॅप तयार केला आहे शासन स्तरावर या निर्णयाची अंलबजावणीही जोरात सुरु आहे. मिरज तहसीलदार कार्यालय याला अपवाद नाही. मात्र तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांनी आपल्या अनोख्या प्रशासकीय शैलीने एक वेगळेपण शासनासमोर ठेवले आहे. मिरज हे तालुक्याचे ठिकाण असल्याने किल्ला भागामध्ये तहसील कार्यालय इमारतीमध्ये विविध शासनाची कार्यलये आहेत रजिस्टार कार्यालय, कृषी विभागाचे कार्यालय तसेच भूमी अभिलेख चे मोजणी कार्यालय याच इमारती मध्ये आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिकांची या इमारती मध्ये ये जा असते त्यामुळे सहाजिकच वाहनांची गर्दी हि मोठ्या प्रमाणावर होते. रोज शेकडो वहाने या आवारामध्ये उभी असतात मात्र या वाहनांना आजपर्यंत कोणतीही शिस्त माहिती नसायची तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांनी हीच गोष्ट लक्षात घेऊन मिरज शहर वाहतूक पोलीस शाखा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी सातत्याने संपर्क साधून या आवारात नागरिकांच्या वाहन पार्किंग साठी पांढरे पट्टे मारले जावेत यासाठी पाठपुरावा केला त्याचे फलित म्हणून आज तहसीलदार आवारातील पटांगणामध्ये वाहनांसाठी पार्किंग चे पट्टे मारले गेले आहेत आमच्या प्रतिनिधींशी बोलताना तहसीलदार डॉ अपर्णा मोरे धुमाळ यांनी सांगितले कि शासनाच्या १०० दिवसांच्या गतिमान प्रशासन हि संकल्पना मी येथे हजर झाल्यापासून सुरूच आहे. माझ्याकडील सर्व कर्मचारी हे शासनाने नेमून दिलेल्या मुदतीत नागरिकांची कामे व्यवस्थित करीत आहेत. त्यामुळे फक्त १०० दिवस शासन निर्णय म्हणून मी या गतिमान प्रशासनाकडे न पहाता मी जोपर्यंत या ठिकाणी आहे तो पर्यंत माझे कार्यालय हे नागरिकांच्या सेवेसाठी नियमानुसार सदैव कार्यरत असेल कोणतेही अवैध काम मी खपवून कधीच घेतलेल नाही यापुढेही घेणार नाही शिस्त हि सर्वांनाच हवी. त्या पुढे म्हणाल्या माझ्या दृष्टीने वेळेला फार महत्व आहे त्यामुळे मी माझ्यापासूनच वेळेचे बंधन पाळत आली आहे मी माझ्या कार्यलयामध्येही वेळेतच पोहोचते. सध्या कार्यालय आवारातील पार्किंग पट्टे हि सुरुवात आहे नागरिकांनीही सहकार्य करावे पट्टे मारलेल्या ठिकाणीच व्यवस्थित आपली वाहने उभी करावीत.त्याचबरोबर माझ्या कार्यालयात मी थेट नागरिकांना भेटून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यामुळे बहुतांशी नागरिक समाधानाने परतलेले मी पहातेय. भविष्यातही या कार्यालयाचे नाव राज्य पातळीवर चांगले ठेवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.
Discussion about this post