ढोकी पोलिस ठाण्यात महिलांचे निवेदन
शशिकांत भुतेकर
(धाराशिव तालुका प्रतिनिधी )
ढोकी/प्रतिनिधी:धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील रणरागिनी महिला ग्रुप, आशास्वंयसेविका व अंगणवाडी सेविकेच्या वतीने पश्चिम बंगाल च्या कलकत्ता येथील महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार करून तिची हत्या करणां-या नराधमास कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी रविवार दि.18 रोजी ढोकी पोलीस स्टेशन मार्फत निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे.
याबाबत ढोकी येथील महिलांनी पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार राजाभाऊ सातपुते यांना पोलिस स्टेशन मार्फत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले की पश्चिम बंगाल मधील कोलकत्ता येथील एका रुग्णालयातिल महिला डाॅक्टर स्वतःची ड्युटी संपवून रात्री आराम करत असताना काही नराधमांनी त्याच्यावर सामुहिक बलात्कार करून त्यांची निर्घुण हत्या केली या घटने चा तीव्र निषेध व्यक्त करत या घटनेतील नराधम आरोपीना पकडून कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली अशा घटना वारंवार सर्वच क्षेञात काम करणां-या महिलावर होत आसुन त्यांना काम करत असताना कुठल्याही प्रकारची भीती वाटू नये असे कडक कायदे अंमलात आणावेत
महिलांच्या सुरक्षेसाठी कठोरात कठोर कायदे करण्यात यावे.अशा घटनेमुळे महिला दहशती मध्ये वावरत असतात अशा अपराधीना कठोर शिक्षा देण्यात यावी अशी महिलांनी निवेदन देऊन मागणी केली आहे या निवेदनावर रणरागिनी महिला ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा सविता सुतार,आरोग्य केंद्राच्या आशासुपरवायझर रेखा गुंजकर-कदम,सोनाली शिंदे,प्रिती सांळुके,वर्षा भुतेकर,सुनिता कांबळे,,रेणुका गाढवे,जकिया शेख,पल्लवी गाढवे,स्वाती दुधाने,कौशल्या कांबळे,अशा कदम,शिल्पा कसबे,मनिषा विर,कल्पना कांबळे,निर्मला कांबळे,वैशाली क्षीरसागर,सुनिता लोमटे,उमा लंगडे, इत्यादी महिलांच्या स्वक्ष-या आहेत
Discussion about this post