
उदगीर / कमलाकर मुळे :
जातीवाद्यांनी शिक्का मारलेल्या अस्पृश्यांसाठी सन 1848 साली स्वतःच्या तालीम आखाड्या जवळ पिण्याच्या पाण्याची विहीर सर्व दलिंतासाठी खुली करून हक्कांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करून देशातील पहिल्या सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवणारे तसेच महात्मा ज्योतिबा व माता सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाला पाठिंबाच नव्हे तर कर्ता,करविता आणि बापची भूमिका निभावुन शैक्षणिक क्रांतीची मशाल पेटवून,जगेन तर स्वराज्यासाठी आणि मरेन तर स्वराज्यासाठी अशी शपथ घेऊन इंग्रज सत्ता उलथुन टाकण्यासाठी हजारो अनामिक क्रांतिकारक समाज सुधारकांची फौज निर्माण करून देश स्वातंत्र्याच्या लढाईची बीज पेरणारे अशा सामाजिक शैक्षणिक व देश स्वातंत्र्याचा चळवळीचे केंद्रस्थान देशपिता आद्यक्रांतिगुरू लहुजी बाबा साळवे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालय किनीयल्लादेवी येथे अभिवादन करताना सरपंच संतोष बिरादार उपसरपंच ज्ञानोबा किर्तीकर तलाठी जनतनी साहेब तंटामुक्त अध्यक्ष बालाजी बिरादार, गोविंद नारागुडे बालाजी शेवाळे, रामकिशन पाटील निवृत्ती कांबळे उमाकांत मुळे संग्राम बिरादार राष्ट्र माझा चे नागनाथ ससाने आदि ग्रामस्थांनी अभिवादन केले..
.
Discussion about this post