
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील धामणी रोडवरील दूर व्यवस्था हा एक गंभीर मुद्दा बनला आहे. या रस्त्यावरून दैनदिन जीवनातील अनेक गावातील नागरिक यात्रा करतात. परंतु रस्त्याची अवस्था इतकी बेकार झाली आहे की नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
मारेगाव ते धामणी मार्गावरील रस्ता हा एक प्रमुख संपर्क मार्ग आहे. ज्यामुळे अनेक गावांचे नागरिक या मार्गाने यात्रा करतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याची दूर व्यवस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक गड्डे आहेत. तर काह ठिकाणी रस्ता पूर्णपणे नष्ट झाला आहे. यामुळे वाहन चालवणे अतंत कठीण झाले आहे. आणि कित्येकदा वाहने खराब होतात.
या रस्त्याच्या दूर व्यवस्थेमुळे नागरिकांना दैनदिन जीवनात खूप त्रास सहन करावा लागत आहे. शाळकरी मुले शाळेत जाण्यासाठी आणि कामावर जाण्यासाठी हा रस्ता वापरतात परंतु, रस्त्याची अवस्था असल्याने त्यांना वेळेवर पोहचणे कठीण होत आहे. त्याचबरोबर व्यापारी आणि शेतकरी यांना सुधा या रस्त्याच्या दूर व्यवस्थेमुळे खूप त्रास होत आहे.
या समस्येची नोटीस घेतली तरी प्रशासन अधिकारी आणि आणि तालुका प्रशासन अधिकारी यांनी या कामाला दुर्लक्ष केलेले आहे. नागरिकांनी अनेकदा या समस्येचे निवारण करण्यासाठी प्रशासनाकडे अर्ज दिले आहेत परंतु कोणतीही प्रभावी कारवाई झालेली नाही . यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे.
Discussion about this post