बाबूराव बोरोळे
जिल्हा प्रतिनिधी लातूर
सद्या रिमझिम पाऊस होत असून या रिमझिम पावसाने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील मौजे डिगोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रवेशद्वारावर पाणी थांबल्याने व चिखलाची घसरगुंडी झाली असून शालेय बाल चिमुकले विद्यार्थ्यांना चक्क पाण्यातून शाळेत ये जा करण्यासाठी परेशान व्हावे लागत आहे याकडे शालेय व्यवस्थापन समितीचे दुर्लक्ष झाले आहे
उदगीर नळेगाव लातूर हा जाणारा राज्य महामार्गावर बनला असून डिगोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही रोड टच आदर्श शाळा आहे. या राज्य महामार्गाची उंची वाढली तर शाळेचे प्रवेश द्वार उंच झाले आहे तर शाळेचा रस्ता खोलवर झाला असल्याने शालेय विद्यार्थ्यांना घसरगुंडी घेत पाण्यातून ये जा करावे लागत आहे व शाळेच्या कंपाऊंड आत घाणीचे साम्राज्य वाढले असून दुर्गंधी पसरली आहे शाळा बंद असताना शाळेच्या गेटवर चढून शाळेत प्रवेश करणे शाळेत घाण करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत परंतु याकडे शालेय व्यवस्थापन समितीचे सर्रास दुर्लक्ष झाले आहे
प्रतिक्रिया
शाळेसमोर गतिरोधक नसल्याने वेगात येणाऱ्या वहानाचा शालेय विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना जिव मुठीत धरून ये जा करावे लागत आहे अनेकाचे किरकोळ आपघात होत आहेत यासाठी या राज्य महामार्गावर दोन्ही बाजूनी स्पीड ब्रेकर करण्यात यावे अशी पालकातून मागणी होत आहे.
दतात्रय बिरादार
पालक
डिगोळ
प्रतिक्रिया
शाळेसमोरुन राज्य महामार्ग गेला असून हा राज्य महामार्गाची उंची वाढली आहे तर शाळेच्या प्रवेशद्वाराची उंची खाली पडली आहे विद्यार्थ्यांना रिमझिम पावसात घसरगुंडी घेत पाण्याच्या ढवातून शाळेत जावे लागते यासाठी शाळेतील पाणी नालीत जात नाही याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे
पालक
राजकुमार अमनवाड
पालक व ग्रामपंचायत सदस्य
डिगोळ
पालक डिगोळ
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील डिगोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही तालुक्यात आदर्श शाळा असून विविध शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य शिक्षक करतात.
एकमेव रोड टच शाळा आहे.शाळेत विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी राज्य महामार्ग ओलांडून यावे जावे लागते वेळोवेळी रस्ता ओलांडताना आपघात होत आहेत याकडे शिक्षण विभागाने लक्ष घालावे
ईश्वर बिरादार
मुख्याध्यापक
जि.प.शाळा.डिगोळ
डिगोळ येथील शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग चालतात तर इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थी संख्या 243 इतकी आहे.तसेच शिक्षक संख्या सात तर शिक्षका संख्या चार आहे असे एकूण 11 आहेत यातील एक शिक्षक सेवानिवृत्त झाल्याने एक जागा रिक्त आहे
प्रतिक्रिया
डिगोळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही एकमेव राज्य महामार्गावर आहे.या राज्य महामार्गाची उंची वाढली आहे येथील शाळेचे प्रवेश द्वार खोलवर पडले आहे प्रवेशद्वाराद्वारे बाल चिमुकल्या शालेय विद्यार्थ्यांना घसरगुंडी द्वारे शाळेत ये जा करावे लागते व रिमझिम पावसात चिखलातून पाणी थांबले त्यातून जावे लागते तसेच शाळेसमोर राज्य महामार्गावर गतिरोधक नसल्याने विद्यार्थ्यांना रस्त्यावरून सोडताना शिक्षकांना थांबावे लागते याकडे प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी येथील उपसरपंच बाबासाहेब पाटील यांनी सांगितले
उपसरपंच
बाबासाहेब पाटील ग्रा.पं.कार्यालय डिगोळ
Discussion about this post