
महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळ यांनी गेली कित्येक वर्षे शेतकऱ्याना आपल्याच शेतात जाण्यासाठी रस्ता मिळावा यासाठी अनेक मोर्चा, आंदोलने केले, त्या आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारने व मा. जिल्हाधिकारी यांनी एक शासन परिपत्रक काढले आहे, व 2 महिन्यात रस्ता खुले करण्याचे आदेश प्रत्येक तालुक्यातील तहसीलदार व गटविकास अधिकारी व संबधित कार्यालय यांना दिले आहे, तरी याविषयी शिरोळ तालुका यांच्या वतीने 18-02-2025 रोजी शिरोळ तहसीलदार मा. अनिलकुमार हेळकर साहेब यांना निवेदन देण्यात आले. त्यांचं बरोबर गटविकास अधिकारी घोलप साहेब, भूमी अभिलेख विभाग शिरोळ, शिरोळ पोलीस स्टेशन यांना लवकरात लवकर रस्ते खुले करण्यात यावे अशी मागणी निवेदना द्वारे देण्यात आले.
यावेळी उपस्थित मा. महादेव कुंभार. ग्रा.पं. सदस्य शिरदवाड, मा. विनायक कांबळे ग्रा. पं. सदस्य शिरदवाड.
मा. जयेश कांबळे युवा नेते, मा. विश्वास फरांडे मार्गदर्शक, प्रज्वल वाघमारे कार्यकर्ते, शेतकरी बंधू मा. प्रशांत पाटिल अकीवाट , रशीद मुल्ला, सुभाष पाटिल अकीवाट , मामतेष जुगळे नादणी. इ कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Discussion about this post