
आज शिवजयंती निमित्त गंगाखेड शहरातील तरुणांनी गंगाखेड शहरात असलेल्या तहसील कार्यालय, डीवायएसपी ऑफिस कार्यालय, पोलीस स्टेशन कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड, रेल्वे ऑफिस गंगाखेड, सार्वजनिक बांधकाम विभाग गंगाखेड अशा सर्व शासकीय कार्यालयात श्री छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा भेट दिल्या असुन. रेल्वे स्टेशन येथे छत्रपती शिवरायांच्या भव्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा परिसराची स्वच्छता करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले.असुन
मूकबधिर विद्यालय दत्त मंदिर गंगाखेड व तसेच मतिमंद विद्यालय गंगाखेड येथे बिस्किट, फराळ, फळे वाटप करण्यात आले.तर
उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप करण्यात आले असुन डॉ कल्पना गीते मॅडम यांच्या उपस्थितीत.श्री.छत्रपती शिवरायांची प्रतिमा भेट देण्यात आली .
महातपुरी फाटा गंगाखेड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे नामकरण करण्यात आले.असुन,
गंगाखेड शहरातील तरुणांनी मिळून आयुष्यभर निर्वासिनी राहण्याचा संकल्प करत तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त निर्व्यसनी राहण्याची शपथ देण्यात आले असुन.
याप्रसंगी संतोष पाटील, अंकुश मदनवाड, ज्ञानेश्वर खटिंग, नितीन चव्हाण, सचिन गायकवाड, चिंतामणी कदम, माधव डमरे, पवन जयतपाल, कृष्णा भोसले, भैय्यासाहेब गायकवाड अभिषेक चव्हाण, अर्जुन कुंडीकर, अनिल भुसारे, व्यंकटेश डोंगरे, कृष्णा शिंदे, वैभव काजबवार, व गंगाखेड येथील तरुण शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रधिनिधी राहुल मगरे. गंगाखेड..
Discussion about this post