

शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य उभे केले -अमित काळे
नगर (प्रतिनिधी) –
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती साजरी करण्यात आली. जुने बस स्थानक येथील शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, जिल्हा उपाध्यक्ष विजय भांबळ, आय टी सेलचे जिल्हाध्यक्ष मंगेश मोकळ, युवक जिल्हा सरचिटणीस दया गजभिये, माजी सरपंच युवराज पाखरे, युवक जिल्हा सचिव गौतम कांबळे, युवक तालुका सरचिटणीस निखिल सुर्यवंशी, युवक भिंगार शहराध्यक्ष महेश भिंगारदिवे, अजिंक्य भांबळ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अमित काळे म्हणाले की, शिवाजी महाराजांनी समता व बंधुत्वाच्या मुल्यांवर स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. समाजातील अन्याय, अत्याचार, दडपशाहीचा त्यांनी बीमोड करुन, प्रजेचे हित हेच अंतिम ध्येय समजून राज्यकारभार केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणासाठी आपले स्वराज्य उभे केले. जात, धर्म, पंथ न मानता त्यांनी सर्वांना न्याय देऊन, समता व बंधुत्व प्रस्थापित केले. परस्त्रीला माते समान वागणूक देऊन त्यांनी नेहमीच महिलांचा सन्मान केला. त्यांचे विचार आज दिशादर्शक व प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले..
Discussion about this post