



राज्यभरात 11 फेब्रुवारी 2025 पासून बारावी बोर्ड परीक्षेला (HSC Exam) सुरुवात झाली आहे. ही परीक्षा शंभर टक्के कॉपीमुक्त व्हावी यासाठी शिक्षण मंडळाकडून अभियान राबवलं जात आहे. यासाठी प्रत्येक केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी बैठे पथक, भरारी पथक परीक्षा केंद्रावर असेल.
मंठा तालुक्यातील स्वामी विवेकानंद विद्यालय केंद्र क्रमांक 463 परीक्षार्थींची शंभर टक्के तपासणी
परीक्षा केंद्राच्या आत मध्ये जाण्याआधी शंभर टक्के विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची झाडाझडती घेतली जाणार आहे. त्यासाठी सुद्धा विशेष यंत्रणा परीक्षा केंद्रांवर सज्ज आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिवाय कुठल्या प्रकारचा गोंधळ निर्माण झाल्यास त्यावर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस बंदोबस्त सुद्धा परीक्षा केंद्रावर ठेवण्यात आला आहे. परीक्षा केंद्रापासून 100 मीटर अंतरावरील झेरॉक्स दुकाने सुद्धा बंद ठेवण्यात आल्या आहेत.
सारथी महाराष्ट्र चा प्रतिनिधी कडून कॉपीमुक्त अभियानाचा रिअॅलिटी चेक करण्यात आली.
दरम्यान या कॉपीमुक्त अभियानाचा रिअॅलिटी चेक सारथी माझाने केला आहे. खरंच या कॉपीमुक्त अभियानातून दिलेल्या सूचनांचा काटेकोरपणे पालन होत आहे का याचा आढावा घेण्यात आला. यादरम्यान विद्यार्थ्यांची तपासणी करणाऱ्या केंद्रप्रमुख एन.पी.पवार सर यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. केंद्रप्रमुख यांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे…
- केंद्रावर विद्यार्थ्यांना कॉपी आणि गैरप्रकार केल्यास कुठल्या प्रकारे शिक्षा होऊ शकते याच्या सूचना दिलेल्या आहेत.
- विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींसाठी बैठे पथक तैनात ठेवण्यात आलेलं आहे.
- शिक्षक, शिक्षकांकडून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची 100 टक्के तपासणी करुन, झाडाझडती करुनच त्यांना केंद्राच्या आत प्रवेश दिला जात आहे.
- पुस्तक, नोट्स, मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या सुद्धा परीक्षा केंद्राच्या बाहेर ठेवल्या जात आहेत.
- बैठे पथकाकडून पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची तपासणी केली जात आहे.
- पोलीस बंदोबस्त परीक्षा केंद्रावर आहे जेणेकरुन गोंधळ निर्माण झाल्यास नियंत्रण ठेवता येईल
- झेरॉक्स मशीन बंद ठेवण्यात आलेले आहे. स्टेशनरी दुकान विद्यार्थ्यांच्या गरजांपुरते सुरु ठेवण्यात आले आहे.
- यावेळी महसूल च्या कर्मचारी पुष्पा परवरे मॅडम,सहाय्यक पर्यवेक्षक माचेवड सर,तसेच पोलीस कर्मचारी यांनी केंद्र कॉपी मुक्त करण्यात मोलाचे योगदान देत आहेत..
Discussion about this post