
अकोट :
( डॉ. संतोष गायगोले तालुका प्रतिनिधी ) अकोट पं. स. अंतर्गत येत असलेल्या रुईखेड ग्रामपंचायत कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन उपसरपंच दादाराव सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय ग्रामिण वार्ताहर विकास परिषद अकोट तालुका अध्यक्ष डॉ. संतोष गायगोले, सामाजिक कार्यकर्ते डॉ. स्वप्नील जवंजाळ, अनंत रोंघे, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन रोंघे यांच्या सह ग्रा. प. सदस्य, आणी गावातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते..
Discussion about this post