
यशश्री प्राथमिक व माध्यमिक विद्यालय तसेच स्पिरिट इंटरनॅशनल कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयामध्ये आज दिनांक 14 फेब्रुवारी 2025 वार शुक्रवार रोजी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला.
प्रसंगी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून यशश्री विद्यालयाचे सहसचिव संकल्प गायकवाड तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवव्याख्याते श्री.कुमार बिरदवडे सर आणि वेल डन कॉमर्स कोचिंग क्लासेस चे संचालक गोविंद गवळी सर लाभले होते. याचबरोबर स्पिरिट इंटरनॅशनल कला,वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती संध्या जाधव न्यू यशस्वी इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक प्रदीप वाघ सर यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री लक्ष्मण हिवाळे सर यांनी भूषविले.
या निरोप समारंभ कार्यक्रमांमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत दाखल झाल्यापासून ते शाळेला निरोप देण्यापर्यंतच्या सर्व आठवणींना उजाळा दिला यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने शाळेबद्दलच्या आठवणी प्रत्येक शिक्षकांचे त्यांना लाभलेले मार्गदर्शन शाळेच्या गमती जमती आपल्या भाषणामध्ये व्यक्त केल्या. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी खास नृत्य गाणी सादर केली.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले शिवव्याख्याते कुमार बिरदवडे सर यांनी विद्यार्थ्यांना महापुरुषांचे विचार आपल्या जीवनात आणून समाजात एक आदर्श कसा घडवायचा याबद्दल मार्गदर्शन केले तर वेल डन कॉमर्स कोचिंग क्लासेस चे संचालक गोविंद गवळी सर यांनी विद्यार्थ्यांना योग्य करिअर कसे निवडायचे आणि मिळालेल्या संधीचे सोने कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशश्री होण्यासाठी विद्यालयातील शिक्षक कमलाकर दौंड , भीमराज गायकवाड, निलेश राजपूत, अरुण शिंदे, योगेश धनेधर, पंकज महामुनी ज्योती मुंडे , माहेश्वरी महाजन मोहिनी शिरसाठ यांनी प्रयत्न केले. कार्यक्रम
सरते शेवटी उपस्थित सर्वांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी तसेच त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील विद्यार्थिनी कु. संध्या आलाटे हिने केले तर आभार प्रदर्शन कु. प्रतीक्षा कंखरे हिने केले..
Discussion about this post