चोर पकडण्यासाठी बीबी पोलीस स्टेशन समोर परिसरातील शेतकऱ्यांचे डफडे वाजवून आंदोलन –
लोणार तालुका
प्रतिनिधी – देविदास वायाळ
बीबी पोलीस स्टेशन परिसरातील शेतकऱ्यांचे मागील 5 ते 7 दिवसापासून अंदाजे 7 ते 8 लाखाचे पाळीव जनावरे चोरी गेल्या प्रकरणी शेकडो शेतकऱ्यांनी बीबी पोलीस स्टेशन समोर डफडे वाजवून आंदोलन केले. मिळालेल्या माहितीनुसार पाळीव जनावरे चोरी गेल्याप्रकारणी शेतकरी रिपोर्ट देण्यासाठी गेले असता संबंधित पोलीस ए पी आय मेहेत्रे यांना भेटून जनावरे चोरी प्रकरणी रिपोर्ट दाखल करून घेत नसल्याने परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी बीबी पोलीस स्टेशनवर नाराजी व्यक्त केली. पोलीस स्टेशन समोर जमा होऊन डफडे आंदोलन करू लागले असता ए पी आय मेहेत्रे यांना पोलीस उपविभागीय प्रदीप पाटील यांना बोलवून घेण्याचे सांगितले व संतप्त शेतकऱ्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी पाटील आल्यानंतर चोरी गेलेल्या जानवरे परत मिळवण्यासाठी समस्या मांडली व संबंधित पोलीस स्टेशनवर नाराजी दर्शवली. चोरी गेलेल्या जाणवरांचे मालकांनी आक्रोश करत आमची जनावरे 2 ते 3 दिवसात परत शोधून द्यावेत व चोरांना पकडून शिक्षा देण्याची मागणी केली.जनावरे चोरी गेलेल्या शेतकऱ्यांपैकी रामप्रसाद उगलमूगले, समाधान पारधे व इतर शेतकरी आपली जनावरे परत मिळावी साठी विनंती करत होते. आणि चोरांना शोधून जनावरे परत मिळवून द्या व कत्तलखाने बंद करा नाहीतर पुढील 4 ते 5 दिवसात जनावरे पोलीस स्टेशन समोर आणून बांधू असा आक्रोश करत आंदोलन केले.
Discussion about this post