प्रतिनिधी:- विजय बारस्कर
श्री संत गजानन महाराज संस्थान मंगलादेवी येथे 146 वा प्रगट दिनानिमित्त 20 2 25 ला उत्साहात पार पडला यात्रा महोत्सव मागला देवी येथे भजन कीर्तन पूजन अभिषेक होम हवन व काल्याचे किर्तन करून महाआरती श्री गजाननाला करण्यात आली. त्यानंतर 8000 लोकांचे महाकाल्याच्या प्रबंध केला. आज दिनांक 21 2 25 ला श्रीची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये अनेक गावच्या भजनी मंडळांनी भाग घेतला. यावेळी, विठ्ठल रुक्मिणी बाल हरिपाठ भजन मंडळ मांगलादेवी, वारकरी हरिपाठ भजन मंडळ भारसवाडी,नवरत्न भजन मंडळ मांगलादेवी, शारदा भजन मंडळ ब्रह्मी, जय भवानी मंडळ येरणगाव, जनाई महिला मंडळ नेर यांनी उत्स्फूर्तपणे मिरवणुकी सहभाग घेतला. व घोडा गाडी पालखी श्री ची आरती करून प्रकट दिनाचा मांगलादेवी गावामध्ये आज सुद्धा आयोजन केले. आपले विनीत म्हणून श्री गजानन महाराज संस्थान ट्रस्टी व समस्त गावकरी मंडळी तथा अध्यक्ष श्री दत्ताभाऊ खवले यांनी नियोजन केले.


Discussion about this post