
273 वर्षांची परंपरा जुन्या जागृत देवस्थान खंडेराव महाराज यात्रा उत्सव सुरुवात मोठ्या उत्साहाने केली.
शिरपूर नजीक अरुणावती नदीच्या काठावरील जुने प्रसिद्ध जागृत देवस्थान खंडेराव महाराज मंदिर 273 वर्षाची परंपरागत यात्रा आणि महाराष्ट्राचे प्रख्यात कुलदैवत माघ शुक्ल पक्ष पौर्णिमा पासून यात्रा उत्सवाला सुरुवात.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून यात्रा उत्सवाला सुरुवात केली सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव बाबा की जय असा जय गजर करून यात्रा उत्सवाला सुरुवात व आरंभ झाला.
याप्रसंगी उपस्थित मान्यवर अध्यक्ष स्थानी महाशय आ. काशीराम पावरा, भूपेशभाई पटेल व भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन भाऊ चौधरी, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद मांडलीक, डीवायएसपी सुनील गोसावी, निरीक्षक केके पाटील नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत सरोदे माजी उप नगर अध्यक्ष राजगोपाल भंडारी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तुषार रंधे, बाजार समितीचे के डी पाटील, विविध पक्षाचे पदाधिकारी मंदिराचे ट्रस्टी आदी मान्यवर व जनसमुदाय उपस्थित होते.
श्री खंडेराव महाराज विकास संस्थांच्या सेवकांसह यात्रींसह मानकराचे यांचा मानसन्मान करण्यात आला. आमदार काशीराम पावरा, भूपेशभाई पटेल, बबनराव चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले. संजय आसापुरे यांनी प्रस्तावना तर यशवंत निखवाडे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थांचे कैलास धाकडे यांनी आभार मानले. सदर यात्रा उत्सव उद्घाटना पासून पंधरा दिवस राहणार बबन भाऊ चौधरी भूपेश पटेल आमदार काशीराम पावरा यांनी प्रशासनास सांगता करत लोकांनी शिस्तीचे पालन करून यंत्रणेला सहकार्य करावे..
Discussion about this post