जोगापुरात पाणी प्रश्न पेटला
- पाणीच नसल्याने नागरिकांनी घेतला आंदोलनाचा पवित्रा
गोंडपिपरी : “जल हि जीवन हे” वाक्याच्या साराचा अर्थ होतो की,पाणी माणसाचे जीवन आहे.म्हणजेच पाणी माणसाची गरज आहे.जर माणसाला पाणी मिळाले नाही तर मानवी जीवन राहणार नाही.म्हणजेच मृत्यूला सामोरे जावे लागेल.अशी वेळ कुणावरही आली नाही पाहिजे म्हणून शासन,प्रशासन जल जीवन मिशन अंतर्गत सार्वजनिक स्तरावर विहीर,हात पंप, नळ यासारखी यंत्रना राबविते.आणि या यंत्रणेची देखभाल दुरुस्तीचे देखील काम पाहते. एव्हढे काही करून जर गावात पाणी मिळत नसेल तर शासनाच्या या योजना आणि यंत्रणा कोणत्या कामाचे.मग अशी वेळ आल्यास प्रत्येक घटकातील, समाजातील माणूस पेटून उठणारच.असाच काहीसा प्रकार तालुक्यातील जोगापूर गावात घडला आहे. नाही भीषण पाणी टंचाईने हैराण असलेल्या नागरिकांच्या संयमाचा बांध अखेर गुरुवारला सुटला आणि प्रशासनाच्या विरोधात ‘आधी पाणी द्या’ च्या मुद्यावर प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.
अखेर दिनांक २० रोज गुरूवारला गावातील नागरिकांनी पंचायत समितीच्या आवारात उपोषण सुरू केले.गावात पाच हातपंप असुन त्यातील तीन हातपंप नादुरुस्त अवस्थेत आहेत. दोन हात पंपातून संपूर्ण गावातील लोकांना पाणी पुरवठा होणे शक्य नव्हते.याखेरीज जन जीवन मिशन अंतर्गत गावात जलकुंभाची निर्मिती करण्यात आली.परंतु या जलकुंभा मधून अद्याप एक थेंब पाणी मिळाले नाही.त्यामुळे नव्याने बांधण्यात आलेले जलकुंभ शोभेची वस्तू बनली असुन हि योजना देखील कुचकामी ठरली आहे.
घरी पिण्यास पाणी नसल्याने गावालगत असलेल्या आक्सापुर येथून नागरिक मजल दरमजल करत पाणी आणून आपली तृष्णा भागवत असायचे.परंतु हा त्रास आमच्याच वाटेला का यावे यासाठी हताश होऊन छत्तरसिंग डांगी,वैभव निमगडे यांच्या नेतृत्वात दिलीप शेट्टीवार,रामदास मोहूर्ले,गीताबाई उद्दकवार,सिंदुबाई गावडे,सुशिलाबाई अल्लुरवार इत्यादी नागरिक प्रसानाच्या विरोधात उपोषणाला बसलेत.पश्चात संबंधित अधिकाऱ्यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन विचार विनिमय केला.मात्र अजून पावेतो समस्येचा तोडगा निघाला नसल्याचे उपोषण कर्त्यांकडून सांगण्यात आले. पाण्याच्या हाहाकरणे विशेष करून महिला चांगल्याच संतप्त झाल्या आहेत.महिला देखील पुरुषांच्या पाठीशी उभे राहून भरउन्हात पाण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे.”माझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा”, अशा घोषणा देत “आम्हाला पाणी द्या, पाणी” अशी मागणी करत आहेत.गावातील विहिरी ,हातपंप कोरड्या पडल्याने येथील पाणी प्रश्न पेटला.म्हणून नागरिकांनी आंदोलन करण्याचा वावित्रा घेतला आहे.
Discussion about this post