
-- दिनांक २१/०२/२०२५ रोजी माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत कार्यरत असणाऱ्या युवक आणि युवतींचा मागण्या संदर्भात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी युवक आणि युवती यांच्या सेवेचा कार्यकाल वाढवून त्यांना सध्या कार्यरत असणाऱ्या आस्थापनेतच कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी ,या प्रमुख मागण्या करिता निवेदन सादर केले. सदर शासनाचा धोरणात्मक विषय असून, लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या विषयांवर तोडगा काढण्या करिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बरोबर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
---- आदरणीय एकनाथराव शिंदे यांच्या या निर्णया बद्दल आनंद व्यक्त होत आहे , मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी योजनेच्या सर्व युवक आणि युवतींना न्याय मिळावा म्हणून शिवसेनेच्या नेत्या, आमदार मनिषा ताई कायंदे आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड हे पाठपुरावा करत आहेत.
- येणाऱ्या काळात योग्य तो निर्णय झाला नाही तर आझाद मैदान मुंबई, येथे साखळी उपोषण करणार असल्याचे माजी खासदार राठोड यांनी सांगितले आहे.
Discussion about this post