
लाखांदूर :-
जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये होणाऱ्या अमुलाग्र बदलांचा विचार करता नवनवीन आव्हानांना सामोरे जाऊन भावी पिढीला जागतिक स्तरावरील आव्हाने स्वीकारण्यास सक्षम करण्यासाठी शिक्षकांना अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे असे वक्तव्य पंचायत समिती लाखांदूर चे गटशिक्षणाधिकारी तत्वराज अंबादे यांनी केले.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडारा स्टार्स व समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2.0 तालुकास्तरीय प्रशिक्षण राधेय विद्यालय पिंपळगाव कोहळी येथे पार पडलेल्या टप्पा दोनच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
सदर कार्यक्रमाचे समारोपीय कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लाखांदूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री तत्वराज अंबादे, श्री भगवान वरवटे ,प्रमुख अतिथी म्हणून यशपाल बगमारे,शहारे सर राधेय विद्यालय तसेच प्रशिक्षणाला तालुकास्तरीय सुलभक म्हणून लाभलेले प्राथमिक विभागाचे खुशाल डोंगरवार,शेषराज सिंगनजुडे,जितू कुरसुंगे, एस.जे. करसाल,माध्यमिक विभागाचे एन. टी. धुर्वे,कु. एस. एम. चौरे,इमदेव नागोसे,एन.सी. ढोलणे आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्मिता चौरे मॅडम,संचालन वालदे सर बारव्हा आणि आभार प्रदर्शन वंदना भोवते मॅडम यांनी केले.
खुशाल डोंगरवार प्रतिनिधी
7588789975
9158573180
Discussion about this post