प्रतिनिधी :- शैलेश मोटघरे गोंडऊमरी/रेल्वे: सातत्याने मुलीच्या जन्मदरात घट होत असल्याने मुलांना लग्नाकरीता मुली मिळणे वरचेवर कठीण होत चालले आहे. यामुळे प्रत्येक गावात प्रत्येक समाजात लग्नाळू मुले-मुली मिळत नसल्याने लग्नाच्या प्रतिक्षेत असल्याने “हुंडा नको मामा, फक्त मुलगी द्या मला” अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
शासनाने गर्भपातावर बंदी आणली तरीही मुलीचा जन्मदर घटतच चालल्याचे दिसून येत असले तरी गोंडऊमरी परिसरातील 13 गावातून घेतलेल्या माहितीमधून मुला मुलींचा जन्मदर सारखाच असल्याचे समोर आले आहे. प्राथामिक आरोग्य केंद्र गोंडऊमरी अंतर्गत येणाऱ्या गोंडऊमरी, वांगी, पळसगाव, महालगाव व वळद या पाच आरोग्य उपकेंद्रात 13 गावे येत असून जवळपास 19 हजार 176 लोकसंखा आहे. जानेवारी ते डिसेंबर 2024 दरम्यान मुलांची 98 तर मुलींची 98 जन्म नोंद असल्याची माहिती आरोग्य कर्मचारी सोनवाने सिस्टर यांनी दिली. मुलांपेक्षा मुलींचा जन्म कमी झाल्याचे बहुतेक ठिकाणी दिसून येते मात्र गोंडऊमरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून देण्यात आलेल्या माहितीनुसार मुलामुलींचा जन्मदर सारखाच असल्याची माहिती आहे.
मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी देशभर विशेष मोहिम सुरू आहे. महाराष्ट्रातही ही मोहित प्रत्येक जिल्हा, तालुका व गावस्तरावर राबविली जात आहे. परंतु, या मोहिमेचा अद्यापही जनसामान्यांवर प्रभाव पडत नसल्यामुळे, मुलींचा जन्मदर दिवसेंदिवस घटत चालल्याचे चित्र बघावयास मिळात असले तरी येथील परिसर त्याला अपवाद आहे.
Discussion about this post