
सारथी महाराष्ट्राचा वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी..
एमएस-सीआयटी (MS-CIT) कोर्स मध्ये AI, ML, सायबर सिक्युरिटी, ChatGPT, DeepSeek Robatic, यांसारख्या आधुनिक कौशल्यांचाही समावेश.
-मास्टर ट्रेनर समाधान जाधव
युवा कॉम्प्युटर अकॅडमीत महिलांसाठी स्वतंत्र कॉम्प्युटर लॅबचे उद्घाटन; AI, ML, सायबर सिक्युरिटी शिकण्यावर भर
शिवूर, 22 फेब्रुवारी 2025: डॉ जे के जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवा कॉम्प्युटर अकॅडमी, शिवूर येथे महिलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र कॉम्प्युटर लॅबचे उद्घाटन ब्रिगेडियर यू. के. ओझा (एनसीसी, संभाजीनगर) यांच्या हस्ते संपन्न झाले.
ब्रिगेडियर ओझा यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांची शैक्षणिक माहिती घेतली. ब्रिगेडियर यांनी सांगितले की, AI (Artificial Intelligence), ML (Machine Learning) आणि सायबर सिक्युरिटी यांसारख्या आधुनिक कौशल्यांचे ज्ञान फक्त विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर पालकांसाठीही महत्त्वाचे आहे. त्यांनी सध्याच्या डिजिटल युगात सायबर सिक्युरिटीची वाढती गरज आणि AI-ML च्या संधींवर भर दिला.
या कार्यक्रमात युवा कॉम्प्युटर अकॅडमीचे संचालक आणि मास्टर ट्रेनर समाधान जाधव यांनी नवीन अभ्यासक्रमांची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, एमएस-सीआयटी (MS-CIT) हा कोर्स आता फक्त बेसिक कॉम्प्युटर ज्ञानापुरता मर्यादित न राहता, यात AI, ML, सायबर सिक्युरिटी, ChatGPT, DeepSeek Robatic, यांसारख्या आधुनिक कौशल्यांचाही समावेश करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास गावातील विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. जीवन विकास कॉलेजचे एनसीसी प्रमुख साळुंखे सर, प्राचार्य बनकर सर, डुकरे सर, संदीप आढाव सर, गाडे सर, पवार सर यांच्यासह स्थानिक नेते आणि सरपंचही उपस्थित होते.
सफियाबादवाडीचे सरपंच बाबासाहेब राऊत, उपसरपंच अनिल भोसले, रघुनाथवाडीचे सरपंच काकासाहेब गायकवाड, शिरीष चव्हाण चुडीवाल, बाळासाहेब मुळे, आणि ज्ञानेश्वर जाधव यांचीही उपस्थिती लक्षणीय ठरली.
हा उपक्रम महिलांना आणि मुलींना स्वतंत्र, सुरक्षित आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी एक नवीन दिशा देणारा आहे. ग्रामीण भागात डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे..
Discussion about this post