42 Total Views , 1 views today
प्रतिनिधी :- नित्यानंद मोरे
1205, रामडोह आळी, वाई येथील सरकार मान्य देशी दारूचे दुकान आणि बिअर शॉपी लायसन नंबर सी एल -|||-27 मध्ये एक्सपायर झालेले बियर विक्री सुरू महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षातर्फे सोमवारी जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांची भेट घेऊन सदर लायसन रद्द करण्याचे मागणी करणार
दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे वायू विधानसभा अध्यक्ष प्रणित मोरे यांना मिळालेल्या माहितीनुसार रामडोह आळी वाई येथील एका देशी दारूचा धंदा प्लस बिअर शॉपी असलेल्या दुकानात एक्सपायर झालेल्या लंडन पिल्सनल कंपनीच्या बिअरची विक्री झाल्याचे समजले यावरून महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनी तेथे जाऊन चौकशी केली असता आमच्याकडून चुकून राहिली असेल व विकली गेली असेल असे उत्तर विक्रेत्याकडून मिळाले. या दारूच्या दुकानात कोणत्याही प्रकारचा बाटल्या विकताना स्कॅन करण्यासाठी स्कॅनर बसवलेला नाही व यांनी याच्या अगोदरही अशा बाटल्या 100% विकले आहेत. अशी खराब झालेले बियर पिऊन लोकांचा मृत्यू होऊ शकतो व याला जबाबदार सर्वस्वीपणे हे दारू लायसन धारक आहे तरही शनिवार रविवार सुट्टी असल्या कारणे सोमवारी जिल्हा अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सातारा यांची भेट घेऊन सदर दुकानावर कारवाई करून लायसन रद्द करा व त्याला टाळे ठोका अशी मागणी महाराष्ट्र पब्लिकन पक्षातर्फे करण्यात येणार आहे.


Discussion about this post