प्रतिनिधी:- प्रमोद जमादार
येत्या 25 फेब्रुवारीला शिरपूर फर्स्ट चा टोल विरोधात भव्य मोर्चा येत्या 25 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक दहा वाजता चोपडा जीन शिरपूर ते टोल नाका असा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. आंदोलक ” न्याय और अधिकार की लढाई मे निमंत्रण नही भेजे जाते जिनका स्वाभिमान जिंदा है व खुद चले आते है “
मित्रांनो, गेल्या आठ महिन्यांपासून आपण शिरपूर अनधिकृत टोल वसुलीवर लढा लढतो आहे शिरपूर स्थानिकांना टोल माफी मिळावी यासाठी संघर्ष सुरू आहे आणि काल झालेल्या सामूहिक बैठकीत असा निर्णय ठरला की येत्या 25 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक दहा वाजेला शिरपूर चोपडा जिन पासून आपण धडक मोर्चा ची सुरुवात होणार आहे तरी मोर्चा करता सर्व शिरपूर शहर तालुक्यातील परिसरातील व तमाम वाहनधारकांना सामान्य जनतेला विनंती करतो की आपण हजारोच्या संख्येने आपण आपल्या वाहनांसह आपल्या गाड्यांसह ह्या मोर्चा, ह्या आंदोलनात सहभागी व्हा अशी विनंती करतो.
जेणेकरून गेल्या बारा वर्षांपासून आपली लूट करणाऱ्या ह्या शिरपूर डेव्हलपरी स्थानिकांना टोल माफी मिळावी ह्यासाठी आपण मोर्चाचे आंदोलन नाचे नियोजन केले आहे व हे नियोजनाचे बळ सामान्य जनता आहे म्हणून जनता जनार्दन ह्या मोर्चात हजारो लाखोच्या संख्येने सहभागी होऊन आपण आठ महिन्यांपासून संघर्ष चालू आहे ह्या संघर्षाचा विजय जनता आपला न्याय मिळवून करेल एवढीच अपेक्षा बाळगतो.असे आंदोलकांचा इशारा.
Discussion about this post