वार्ताहर प्रतिनिधी – निवृत्ती दाभाडे
पहाट फाउंडेशन छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित राष्ट्संत गाडगेबाबा जयंती सोहळ्यामध्ये सिल्लोड तालुक्यातील तळणी येथील सदगुरू कॉम्प्युटर्स चे संचालक श्री विश्वभर सोनवणे यांना राष्ट्संत गाडगेबाबा आदर्श संगणक शिक्षक हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. शैक्षणिक व मानसिक दृष्ट्या सक्षम करत समाजात एक वेगळा आदर्श निर्माण करणाऱ्या व डिजिटल शैक्षणिक या क्षेत्रात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्यावर भर देत पत्रकारिता व संगणक शिक्षण या क्षेत्रात आपली भूमिका मोठ्ठ्या सक्षमतेने पार पडत आहेत.आपल्या शिकवणीच्या कौशल्यावर त्यांनी त्यांच्या विद्यार्थांना देखील विविध स्पर्धेमध्ये जिल्हा पातळीवर प्रथम ठेवले आहे.अशाच सर्व गुणांचा विचार करून अशा हुन्नरी माणसांचा कलाकारांचा पहाट फाउंडेशन यांच्या विचारातून मार्गदर्शनातून दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना विशेष पुरस्कार देवून गौरवण्यात येते वर्ष २०२५ या शैक्षणिक वर्षात पहाट फाउंडेशन यांच्या अंतर्गत आयोजित पुरस्कार सोहळ्यात श्री विश्वंभर सोनवणे यांना डिजिटल शिक्षण या श्रेणी अंतर्गत राष्ट्संत गाडगेबाबा राज्यस्तरीय पुरस्कार प्रमुख पाहुणे मा.श्री.भाऊ भजने सामाजिक कार्यकर्ते ,मिसेस इंडिया विजेत्या मा.श्वेता परदेशी,प्रसिद्या साहित्यिक व्याख्याते प्रा.डॉ.संजय गायकवाड,पहाट फाउंडेशन चे संचालक अमोल भिलंगे व सोनवणे यांचे आई-वडील व मान्यवरांच्या उपस्थितीत रविवार रोजी शेगाव येथे पुरस्कार प्रदान करण्यत आला.
विश्वंभर सोनवणे यांना सन्मानित केल्याबद्दल भाजपा तालुका अध्यक्ष श्री अशोक गरूड यांनी अभिनंदन केले.
Discussion about this post