
सप्तशृंगी गड :
श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड ते नांदुरी घाट रस्त्याची सुधारणा करण्याच्या कामाच्या अनुषंगाने व वाहतुक नियंत्रण करणेकामी उपाययोजना करणेबाबत आज सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. श्रीक्षेत्र सप्तशृंगी गड ते नांदुरी अभोणा- कनाशी – मानुर-आलियाबाद या २१ कि. मी. ०-०० ते १०-०० मध्ये रस्त्याची सुधारणा करणे आहे. सदर काम केंद्रीय मार्ग निधी
योजने अंतर्गत मंजूर असून सदर काम सद्दस्थितीत पूर्ण वेळ (२४ तास ७ दिवस सुरू असून सदर कामांतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण प्रगतीपथावर चालू आहे. सदर काम करतांना रस्ता सुरक्षेचे सर्व उपाययोजनांसह रस्त्याच्या एकाच बाजू मध्ये (वन साईट काम करण्यात येत असून उर्वरीत बाजू (वनवे) वाहतुकीसाठी सहस्थितीत खुला आहे.
तथापि, सप्तश्रृंगी गडावर येण्या जाण्यासाठी नांदुरी येथुन रामा-२१ हा एकमेव मार्ग उपलब्ध असल्याने सदर रस्त्याचे काम चालू असल्याने सदर घाट मार्गात वारंवार वाहतुक कोंडीची परिस्थिती उद्धभवत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने वाहतुक नियंत्रण करणेकामी उपाययोजना करणेसंदर्भात कळवण उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अकुनुरी नरेश यांच्या दालनात आज सोमवार दिनांक २४ रोजी दुपारी १ वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे..
Discussion about this post