
रंगकर्मीच्या राज्यस्तरीय चित्रकला निबंध लेखन रंगभरण स्पर्धेचे पारितोषिक वितरण
संविधान दिन अमृत महोत्सवी वर्ष निमित्त !
विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाबद्दल जागृती
उदगीर…., रंगकर्मी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय चित्रकला निबंध लेखन व रंगभरण स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र उदगिरी महाविद्यालय उदगीर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे .यावेळी बसवराज पाटील नागराळकर , कामगार आयुक्त मंगेश झोले उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार राम बोरगावकर गटविकास अधिकारी प्रविण सुरडकर महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, गटशिक्षणाधिकारी शफिक शेख यांच्यासह मान्यवर उपस्थिती राहणार आहेत. रंगकर्मी च्या वतीने संविधान दिन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेसाठी भारतीय संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्य हा विषय तर चित्रकला व रंगभरण स्पर्धेसाठी राष्ट्रीय प्रतीके हा विषय ठेवण्यात आला होता या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधान बद्दल संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्य , तसेच राष्ट्रीय प्रतीका जागगृती व्हावे व विद्यार्थी एक सजग नागरिक निर्माण व्हावा या हेतूने या स्पर्धेचे आयोजन केले होते
कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन
अध्यक्ष प्रा बिभीषण मद्देवाड ,सचिव प्रा ज्योती कवडेकर मद्देवाड , सिद्घार्थ सुर्यवंशी ,मुख्याध्यापक दादाराव दाडगे ,अॅड महेश मळगे ,रसुल दा पठान, रविंद्र हासरगुंडे , रामदास केदार लक्ष्मण बेंबडे ,मारोती भोसले , महादेव खळूरे , सिद्घार्थ सुर्यवंशी , सचीन शिवशेट्टे , प्रल्हाद येवरीकर,,जहाँगीर पटेल , निता मोरे ज्ञानेश्वर बडगे ,विवेक होळसंबरे , विक्रम हलकीकर,टी डी पांचाळ , बालाजी भोसले , अर्चना पाटील , हणमंत केंद्रे ,नागनाथ गुट्टे ,संदिप निडवदे, मनोहर लोहारे,आदीनी केले आहे.
Discussion about this post