
प्रतिनिधी :- प्रमोद जमादार
धुळे जिल्ह्यातील आग्रा मुंबई या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील हाडाखेड (पूर्वी पळासनेर ) आरटीओ चेक पोस्टवर पैशांचा पाऊस पडतो असे कोणी म्हणेल परंतु ते अर्धसत्य. या चेक पोस्टवर पैशांचा अक्षरशा ढगफुटी सुरू असते ही बाब लक्षात घेतली पाहिजे कारण महाराष्ट्रात आरटीओ ची जी काही मोजकी मलाईदार चेक पोस्ट आहेत त्यात हाडाखेडचे पोस्ट वरच्या क्रमांक वर आहे नवापूरच्या गव्हाली चेक पोस्टवर काही दिवसांचीच ड्युटी लावण्यासाठी म्हणून आरटीओ निरीक्षकांकडून काही रक्कम मोजली जाते लाच लुचपत वाले वरिष्ठांना रंगेहात पकडून यावरून गव्हालीला दररोज एकेका आरटीओ ची किती पेट्यांची कमाई असेल याची कल्पना येते गवाली सारख्या ठिकाणी जर पैशाचा इतका पाऊस पडत असेल तर मग हाडाखेड सारख्या महाराष्ट्रातल्या मोठ्या व हेवी चेक पोस्टवर तर पैशांचा आभाळच फुटला सारखे होते.
असे कोणी म्हणेल जिल्ह्यात छटक छटक प्रकरणात तोडी पाणी करणारे कितीतरी महाभाग आहेत परंतु एक तोळ्या फिर हाडाखेडीच्या या पैशांच्या ढगफुटी बाबत ओरड करताना दिसत नाही त्याचे कारण आरटीओ कडच्या ‘भिकारी डायरी’ हा चमत्कार आहे. ही भिकारी डायरी दरमहाच्या पगाराप्रमाणे पुढच्या पुढे पगार करून अनेकांचे तोंड बंद ठेवत असते ही भिकारी डायरी प्रकार मोठा आहे तरीसुद्धा या भिकारी डायरीचे काय घेता, यात काही बडे ही हात धुऊन घेतात हे पळासनेर ( हाडाखेळ) चेक चेक पोस्टवर प्रचंड गाजले होते. असा हा भ्रष्टाचार कमी करण्यासाठी अशा विभागात मानवी हस्तक्षेप बंद करून फेसलेस ऑनलाईन कार्यपद्धती अंगीकारली पाहिजे माननीय पंतप्रधान ना. नरेंद्र मोदी यांनी ही पूर्वीच अशा फेसलेस डिजिटल कार्यपद्धतीची सूचना केली होती महाराष्ट्रात आज मंत्रालयात जी खाते मलाईदार आहेत असे मानले जाते त्यात परिवहन हे वरच्या क्रमांकावर येते..
Discussion about this post