कडेगाव तालुक्यातील उत्पादकांतून नाराजी
दूध व्यवसायाला उभारी देण्यासाठी शासनाने गाईच्या दुधाला सुरुवातीला प्रतिलिटर ५ रुपये व त्यानंतर ७ रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे दूध व्यवसायाला उर्जितावस्था प्राप्त होईल असे वाटत होते. मात्र अनुदानही मिळाले नाही आणि उत्पादन खर्चही वाढला आहे. कडेगाव तालुक्यात हजारो दूध उत्पादकांचे लाखोंचे अनुदान रखडले आहे. परिणामी उत्पादकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून दूध व्यवसायाकडे बघितले जाते. जिल्ह्याच्या काही भागात अनेक वर्षांपासून शेतीला जोडधंदा म्हण म्हणून दुग्ध व्यवसाय केला जात होता. लाखो रुपयांची गुंतवणूक या व्यवसायामध्ये झालेली आहे. परराज्यातून गाई, म्हशी खरेदी करून तरुण शेतकऱ्यांनी या व्यवसायामध्ये बस्तान बसविले आहे.जानेवारी २०२४ पासून शासनाने गाईच्या दुधाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान जाहीर केले होते. त्यानंतर अनुदानामध्ये वाढ करून ते प्रति लिटर ७ रुपये करण्यात आले होते. त्यामुळे दूध उत्पादकांना दिलासा मिळाला होता.
गाईच्या दुधाला अनुदान मिळणार असल्याने उत्पादकांच्या हातात चार पैसे पडतील अशी आशा दूध उत्पादकांना होती. मात्र अजूनही अनुदान मिळाले नाही.
दुध उत्पादक आंदोलनाच्या तयारीतएनसी उत्पादकांच्या खात्यावरवॉचशासनाने गायीच्या दुधाला अनुदान जाहीर करूनही अनुदान जमा झालेले नाही. गावा-गावातील दुध संकलन केंद्र चालकांकडून संघांकडे तसेच शासनाकडे बोट दाखविले जात आहे. त्यामुळे उत्पादक संभ्रमात आहेत. काहींनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
Discussion about this post