भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
बऱ्हाणपूर येथील सार्वजनिक वाचनालयाला 23 फेब्रुवारी 2025 रोजी गुंज संस्था यांच्या पुढाकाराने परदेशी विद्यार्थ्यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी वाचनालयातील अभ्यासक्रमांचा आढावा घेत मार्गदर्शन केले. स्पेन, फिलिपिन्स, काँगो, टांझानिया, नोकरगोया, सिंगापूर, झेन रिपब्लिक आणि इंग्लंड येथील विद्यार्थ्यांनी वाचनालयाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी केवळ लिहिण्या-वाचण्यापुरते शिक्षण न राहता, त्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी व ते विविध क्षेत्रांमध्ये, विशेषतः सरकारी सेवेत रुजू व्हावेत, या उद्देशाने हे वाचनालय सुरू करण्यात आले आहे. अल्पावधीतच वाचनालयाच्या उपक्रमांना यश मिळत असून, आतापर्यंत दोन विद्यार्थी सरकारी सेवेत रुजू झाले आहेत.
या भेटीदरम्यान परदेशी विद्यार्थ्यांनी वाचनालयाच्या उपक्रमांचे कौतुक केले. ग्रामीण शिक्षणाच्या वाढीसाठी अशा प्रयत्नांची गरज असून, हे वाचनालय त्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहे, याचा विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना अभिमान वाटत आहे.
Discussion about this post