
निलेश सोनोने,
ग्रामीण प्रतिनिधी पातुर..
पातुर पंचायत समिती अंतर्गत सुकळी येथे शासकीय जागा ग्रामपंचायतीने दोन भोगवटदाराच्या नावावर केल्याचे झालेल्या दिनांक १४/०२/२०२५ चौकशी अहवालातून उघड झाले असून कारवाईसाठी पातुर चे गटविकास अधिकारी सुनीता इंगळे मॅडम यांनी पंचायत विभागचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे नुकताच अहवाल सादर केला आहे. सुकळी येथे शासकीय जागेचा नमुना ८ फेरफार करून
५८४ आणि ५८५ या मालमत्ता क्रमांक वरील स्वतः मालकीच्या अनुक्रमे श्री.लीलाबाई दादाराव गवई , श्री. आनंद दादाराव गवई यांच्या नावावर केल्याचा आरोप गावकरी मंडळी यांनी संबंधितांना दिलेल्या तक्रारीतून केला होता.
शासकीय जागेची मालमत्ता क्रमांक ५८४ एकूण क्षेत्रफळ ८७५ चौ.फूट आणि ५८५ चे एकूण क्षेत्रफळ ८२५ चौरस फूट असे आहे दोन भोगवटाराच्या नावाने केल्याचे ग्रामपंचायत च्या सन 2021 2022 चे जमिनीचे कर आकारणी नोंदवही नमुना क्रमांक नमुना ८ चे मूळ अभिलेखावरून उघड झाल्याचे निष्नन झाले आहे .सदर अहवाल कारवाईसाठी पातूरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर करताच ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. मीराबाई प्रकाश जाधव यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे धाव घेऊन तक्रारीशी संबधीत सर्व दस्ताऐवज सादर केले.
तत्का.ग्रामसेवक आर.जी. घाटोळ यांनी नमुना ८ मध्ये बदल केल्याचे कार्यरत ग्रामसेवक कु.व्ही.डी.खाकरे यांनी दिनांक दिलेल्या उत्तरात म्हटले आहे परंतु ह्या दोन्ही ग्रामसेवक यांनी केले नाही याच्या मागे दुसरा कोणी मुख्य सूत्रधार असून मुख्य आरोपी स्पष्ट ठरवे पर्यंत अज्ञात व्यक्ती विरुद्ध तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावे असे दिनांक २०/०२/२०२५ रोजीच्या तक्रारीतून म्हटले आहे .
येत्या ०२/०३/२०२५ पर्यंत मुख्य आरोपीवर गुन्हा दाखल केला नाही तर दिनांक ०४/०३/२०२५ पासून १० ते १५ जन उपोषणाला बसणार असल्याचे दिलेल्या तक्रारीतून उपसरपंच यांनी सांगीतले आहे.यावर काय कारवाई होते याकडे सुकळी वासियांचे लक्ष लागले आहे.
- सुकळी ग्रामपंचायतीचे सरपंच यांचा पूर्ण मनमानी कारभार चालू आहे. त्यांनी विनापरवानगी मुरूमाचे सुध्दा उखनन केले आहे सिंचन विहिरी मध्ये सुद्धा अडथळे निर्माण करीत आहेत.
श्री.आर.जी.घाटोळ आणि कु. व्ही.डी.खाकरे हे दोन्ही ग्रामसेवक या प्रकरणाशी संबंधित नाही याचा मुख्य सूत्रधर दुसरा कोणी आहे त्याच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा
उपसरपंच सौ.मीराबाई प्रकाश जाधव..
Discussion about this post