

पालम प्रतिनिधी : सय्यद मैनोदिन
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील चिंचोली दराडे येथील युवक दिपक विलासराव दराडे हा स्वतः च्या शेतावरून घराकडे निघाला असता जिंतूर ते औंढा महामार्गावरुन जात असताना एका दुचाकी ने धडक दिल्याने सदरील युवकास आपल्याला काही झाले नाही असे समजून घरी जाऊन झोपला.सकाळी तो झोपेतून न उठल्यामुळे नातेवाईक यांनी परभणी शहरातील देवगिरी हास्पिटल येथे दाखल करण्यात आले, येथिल डॉ, एकनाथ गबाळे यांनी तपासणी केल्यानंतर अपघातात डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव होऊन मेंदू मृत घोषित केले, कुटुंबियांना धिर देत अशा स्थितीत अवयव दान करता येते अशी माहिती दिली या वेळी दिपक चे वडील विलासराव श्रिपतराव दराडे व आई कुसुम विलासराव दराडे, भाऊ राजु दराडे, मामा अँड, भगवानराव घुगे, गणेशराव घुगे यांनी डॉ , एकनाथ गबाळे आणि डॉ अतुल जाधव यांच्याशी सविस्तर चर्चा करून अवयव दान करण्याचा निर्णय घेतला,आई वडिलांनी आपला मुलगा अवयव दानाच्या रुपात जिवंत असेल असे सांगितले.तात्काळ डॉ एकनाथ गबाळे आणि झोनल अवयवदान समीती यांना कळविले, आणि दिपक यांचे शरिरातील पाच अवयव दान करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार पुर्व नोंदनी नुसार केलेल्या गरजु रुग्णांना पाचही अवयव त्या त्या शहरांमध्ये तातडीने ग्रिन कॉरिडॉर तयार करून पाठवण्यात आले परभणीत अवयव दान यशस्वी करण्यासाठी डॉक्टरांनी अतिशय सुंदर कामगिरी बजावली यात डॉ एकनाथ गबाळे, डॉ अतुल जाधव, डॉ राहुल टेंगसे डॉ निहार चांडक डॉ राहुल राठोड डॉ विनोद सुर्यतळे डॉ कौशल कोंडावार डॉ अजय कूंडगिर डॉ श्रुती शहाने आदी चा समावेश होता, सकाळी सहा वाजल्यापासून हि शस्त्रक्रिया करण्यात आली सर्व प्रथम हृदय ❤️ तात्काळ ग्रिन कॉरिडॉर ने नांदेड येथून मुंबई येथे पाठविण्यात आले, तेथे एका महिलेला प्रत्यारोपण करण्यात आले, व पाठोपाठ फुफ्फुस पुणे येथे तर यकृत समृद्धि महामार्गाने हिंगोली मार्ग नागपूर येथे तर एक किडनी छत्रपती संभाजी नगर येथे व दुसरी बारा वर्षांनी डायलिसिस असलेल्या रुग्णांना व्यक्ती ला देण्यात आले अशी माहिती अवयव दान समितीचे समन्वयक विनोद डावरे यांनी दिली.असेच या पुर्वी ब्रेनडेड झालेल्या रुग्णांची दोन्ही किडनी व अवयव दान करण्यात आले होते या वेळी देखील असेच अवयव दान करण्याचि प्रकिया अतिशय अशा चांगल्या पद्धतीने देवगिरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल च्या माध्यमातून होत असल्याने जिल्ह्यात व परिसरात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सर्व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन केले जात आहे, तरी परभणी जिल्ह्यातील गरजु रुग्णांनी यात सहभागी होण्याचे आवाहन देखील डॉ एकनाथ गबाळे आणि डॉ अतुल जाधव यांनी सांगितले..
Discussion about this post