


शिरूर तालुका प्रतिनिधी :-
शिरूर शहरात आज भक्तिमय वातावरणात प्रभू श्री.रामलिंग महाराज यांच्या पालखी मिरवणुकीचे भव्य आयोजन करण्यात आले. शहरभर भक्तगणांच्या उत्साही उपस्थितीने पालखी मार्गात भक्तिभावाने जयघोष आणि भजनांचा जल्लोष रंगला.
पंरपरेनुसार पालखी मार्ग स्वच्छ आणि सुशोभित ठेवण्यासाठी नगरसेवक संदीप गायकवाड यांनी यावर्षीही विशेष स्वच्छता उपक्रम राबवला. या उपक्रमांतर्गत शिवसेवा मंडळ, पाचकंदील चौक, रामआळी, मारुतीआळी, बि. जे. कॉर्नर, हलवाई चौक, सुभाष चौक आणि डंबेनाल या प्रमुख मार्गांवरील रस्ते धुवून पालखी मार्ग निर्मळ व सुंदर करण्यात आला.
विशेष म्हणजे, हा उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी पाण्याच्या ट्रॅक्टरचे सौजन्य सौरभ पाचर्णे यांनी दिले. त्यांच्या योगदानामुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.
स्वच्छतेचा संदेश आणि समाजासाठी प्रेरणादायी कार्य
शहर व पंचक्रोशीतील नागरिक नगरसेवक संदीप गायकवाड यांच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक करत आहेत. धार्मिक उत्सवांसोबत स्वच्छतेला प्राधान्य देण्याचा हा स्तुत्य उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे. प्रत्येक सण, उत्सव यामध्ये स्वच्छतेला प्राधान्य दिल्यास समाजात स्वच्छतेची सवय रुजवता येईल आणि पर्यावरण रक्षणालाही हातभार लागेल.
शिरूर शहराने घेतलेला हा स्वच्छता उपक्रम संपूर्ण समाजासाठी एक आदर्श आहे. भविष्यात देखील असे विधायक उपक्रम राबवले जावेत, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे..
Discussion about this post